
मुंबई : मराठी रंगभूमीवरील ‘सिरीयल किलर’ या नाटकाने 100 प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक शिवाजी मंदिर येथे या नाटकाचा 100 वा प्रयोग उत्साहात पार पडला. या विशेष सोहळ्याला राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कलाकार आणि संपूर्ण टीमचे केले कौतुक
सिंधूसंकल्प एंटरटेनमेंट प्रा. लि. प्रस्तुत आणि प्रणय तेली निर्मित ‘सिरीयल किलर’ या नाटकाने आपल्या अभिनय आणि सादरीकरणाच्या जोरावर प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. 100 प्रयोगांचा टप्पा गाठणे ही संपूर्ण टीमसाठी अभिमानाची बाब असल्याचे नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.
एखादे नाटक 100 प्रयोगांपर्यंत पोहोचण्यासाठी कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शकाचे मार्गदर्शन, निर्मात्यांची मेहनत आणि पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे योगदान महत्त्वाचे असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. अशा कलाकृतींमुळे मराठी रंगभूमीची परंपरा अधिक समृद्ध होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आज शिवाजी मंदिर, दादर येथे सिंधूसंकल्प एंटरटेनमेंट प्रा. लि. प्रणय तेली निर्मित ‘सिरीयल किलर’ या नाटकाच्या १०० व्या प्रयोगाला उपस्थित राहण्याचा योग आला.
मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाच्या आणि सादरीकरणाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत नाटकाला यशस्वीपणे १०० प्रयोगांचा टप्पा गाठून देणे ही निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानाची बाब आहे. एखादे नाटक १०० प्रयोगांचा टप्पा गाठते, तेव्हा त्यामागे कलाकारांचा कसदार अभिनय, दिग्दर्शकाचे कल्पक मार्गदर्शन, निर्मात्यांची मेहनत आणि पडद्यामागील प्रत्येक व्यक्तीचे योगदान असते. यावेळी नाटकाचे दिग्दर्शक केदार देसाई, सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री गायत्री दातार यांच्यासह नाटकाच्या संपूर्ण टीमची भेट झाली. त्यांच्या मेहनतीचे, कलात्मक दृष्टिकोनाचे आणि रंगभूमीवरील योगदानाचे मनापासून कौतुक केले. ‘सिरीयल किलर’च्या संपूर्ण टीमचे १०० व्या प्रयोगानिमित्त मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी आणि यशस्वी प्रयोगांसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या ! #सिरीयलकिलर #serialkillar #marathidrama #मराठीनाटकं — Nitesh Rane (@NiteshNRane) November 22, 2026
भाऊ कदम, गायत्री दातार यांची उपस्थिती
या कार्यक्रमात नाटकाचे दिग्दर्शक केदार देसाई, सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम आणि अभिनेत्री गायत्री दातार यांच्यासह संपूर्ण नाटकाच्या टीमची नितेश राणे यांनी भेट घेतली. कलाकार आणि तंत्रज्ञांच्या मेहनतीचे त्यांनी कौतुक केले.
100 व्या प्रयोगानिमित्त नाटकाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत त्यांनी पुढील वाटचालीसाठी आणि आगामी प्रयोगांसाठी शुभेच्छा दिल्या.






