Sunday, November 22, 2026

KBC मधील पंजाबवरील प्रश्नामुळे वाद; अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीला कायदेशीर नोटीस

महानायक अमिताभ यांचा कौन बनेगा करोडपती या सोनी टीव्हीवरील शोमुळे खुद्द बिग बी आणि चॅनेल दोघांच्या समस्येत वाढ झाली आहे. या दोघानांही नोटीस बजावण्यात आली आहे. 'कौन बनेगा करोडपती' या शो मध्ये विचारण्यात आलेल्या 12.50 लाख रुपयांच्या एका प्रश्नावावरून हा वाद निर्माण झाला आहे.

Kaun Banega Crorepati: महानायक अमिताभ यांचा कौन बनेगा करोडपती या सोनी टीव्हीवरील शोमुळे खुद्द बिग बी आणि चॅनेल दोघांच्या समस्येत वाढ झाली आहे. या दोघानांही नोटीस बजावण्यात आली आहे. 'कौन बनेगा करोडपती' या शो मध्ये विचारण्यात आलेल्या 12.50 लाख रुपयांच्या एका प्रश्नावावरून हा वाद निर्माण झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सुमारे 2 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन यांनी 12.50 लाख रुपयांसाठी एक प्रश्न विचारला आहे. "अलीकडेच कोणत्या राज्यातील गुन्हेगार पोलीस ठाण्यांवर बॉम्बस्फोट करण्यास घाबरत नाहीत?" असा हा प्रश्न आहे. या प्रश्नावरून पंजाबमध्ये वाद निर्माण झाला आहे. याशिवाय अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीला नोटीस बजावण्यात आली आहे.

पंजाबला गुन्हेगारी आणि पोलीस ठाण्यांवरील बॉम्बस्फोटांशी जोडणाऱ्या या प्रश्नावर राज्यातील लोकांनी आक्षेप घेतला आहे. संगरूर येथील एका वकिलाने अमिताभ बच्चन आणि सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये राष्ट्रीय आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून वादग्रस्त प्रश्न आणि त्यासोबतची व्हिडिओ क्लिप काढून टाकावी, तसेच पंजाबच्या लोकांची बिनशर्त सार्वजनिक माफी मागण्यात यावी आणि या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात येईल, असं सांगण्यात आले आहे.

रणजीत सिंग यांच्या वतीने वकील इंदरजीत अरोरा या 32 व्यक्तींनी ही नोटीस पाठवली. ही नोटीस केबीसीचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांना, एबी कॉर्प लिमिटेडमार्फत त्यांच्या दुसऱ्या पत्त्यावर, आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली आहे. वकील इंदरजीत अरोरा यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल बोलताना ते म्हणाले, "काही दिवसांपूर्वी माझ्या पक्षकाराने मला सोनी टीव्हीवर प्रसारित झालेल्या केबीसी शोमधील काही स्क्रीनशॉट्स आणि एक व्हिडिओ क्लिप दाखवली. त्यात 1.25 दशलक्ष रुपयांचा प्रश्न विचारण्यात आला होता, 'अलीकडे कोणत्या राज्यात गुन्हेगार पोलीस ठाण्यांवर बॉम्बस्फोट करण्यास घाबरले नाहीत?' हा प्रश्न पंजाबला गुन्हेगारीशी जोडण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे राज्याच्या प्रतिमेवर याचा थेट परिणाम होऊ शकतो.", असे ते म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले, "या आधारावर आम्ही सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आमची मागणी आहे की तो वादग्रस्त प्रश्न आणि व्हिडिओ तात्काळ काढून टाकण्यात यावा आणि पंजाबच्या लोकांची बिनशर्त माफी मागावी. अशा प्रकारे कोणत्याही एका राज्याला लक्ष्य करणे योग्य नाही." वकिलांनी व्हिडिओबद्दल आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. तो व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने तयार केला गेला असावा, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. तपासात हे उघड झाल्यास, व्हिडिओ तयार करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

भारतीय टेलिव्हिजनवरील 'कौन बनेगा करोडपती' हा सर्वात लोकप्रिय क्विझ शोपैकी एक आहे. याची सुरुवात 2000 साली झाली आणि बऱ्याच काळापासून अमिताभ बच्चन याचे सूत्रसंचालन करत आहेत. 'हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनेअर?' या ब्रिटिश क्विझ शोच्या भारतीय आवृत्तीवर आधारित असलेल्या या शोमध्ये, स्पर्धकांना सामान्य ज्ञान, इतिहास, विज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जगाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. प्रत्येक योग्य उत्तरासोबत, स्पर्धक बक्षिसांच्या रकमेत वाढ होत जाते आणि मोठी रक्कम जिंकण्याच्या संधीसाठी अंतिम प्रश्नापर्यंत पोहोचतात. प्रश्न हळूहळू अधिक कठीण होत जातात. आणि या कठीण प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी स्पर्धकांकडे लाइफलाइनचा पर्यायही उपलब्ध असतो. अमिताभ बच्चन केवळ प्रश्नच विचारत नाहीत, तर स्पर्धकांशी संवादही साधतात.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >