
Viral News: लग्नसमारंभात नवरदेवांना फुलांचे किंवा नोटांचे हार घातल्याचे अनेकवेळा तुम्ही पाहिले असेल. मात्र, उत्तर प्रदेशातील नागला फोंडा गावात झालेल्या एका घोडचढी सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. येथे दोन नवरदेवांना त्यांच्या मेहुण्याने प्रत्येकी 1 कोटी रुपयांच्या नोटांच्या माळा भेट दिल्या. या अनोख्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
दोन्ही नवरदेवांना कोटींच्या नोटांचे हार
मिळालेल्या माहितीनुसार, नागला फोंडा गावातील योगेंद्र सिंह आणि कुशलपाल सिंह यांच्या कुटुंबातील प्रशांत आणि कान्हा राघव या दोघांची शनिवारी घोडचढी काढण्यात आली. त्यांचे लग्न गोवर्धन परिसरात मुडसेरा गावातील तरुणींशी होणार होते.
या सोहळ्यात राजस्थानमधील कामन परिसरातील नांदोला गावचे रहिवासी योगेश कुमार उर्फ भूरा ठाकूर यांनी आपल्या मेहुण्यांना खास भेट देण्याचे ठरवले. त्यांनी दोन्ही नवरदेवांच्या गळ्यात प्रत्येकी 1 कोटी रुपयांच्या नोटांपासून तयार केलेली भव्य माळ घातली.
View this post on Instagram
100 फूट लांबीच्या माळा सांभाळण्यासाठी अनेकांची मदत
या माळा 500 रुपयांच्या नोटांपासून तयार करण्यात आल्याचे सांगितले जाते. प्रत्येक माळ सुमारे 100 फूट लांब असल्याने त्यांचे वजन आणि आकार मोठा होता. त्यामुळे या माळा सांभाळण्यासाठी अनेक लोकांना मदत करावी लागली. छतावरून या माळा नवरदेवांच्या गळ्यात घालण्यात आल्या.
घोडचढीच्या मिरवणुकीत हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी गावकरी आणि नातेवाईकांची गर्दी झाली होती. अनेकांनी हा क्षण मोबाईलमध्ये टिपला. त्यानंतर या सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आणि परिसरात या अनोख्या भेटीची चर्चा सुरू झाली.






