Saturday, November 21, 2026

Prahaar Marathi News Live, 22 November 2026: महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, एका क्लिकवर वाचा आजच्या घडामोडी!

Prahaar Marathi News Live Updates: राज्यातील ताज्या राजकीय हालचाली, हवामान अंदाज, मुंबई-पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि देश-विदेशातील सर्वात वेगवान लाईव्ह अपडेट्स येथे पाहा.

Prahaar Marathi News Live दिनांक 22 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या, राष्ट्रीय राजकारण, अर्थजगत, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडींचे थेट प्रक्षेपण उपलब्ध करून देण्यात आले आहे. दिवसभरातील सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा एका क्लिकवर
LIVE UPDATES

Prahaar Marathi News Live Updates : रणबीर कपूरच्या 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर धमाका; १७ व्या दिवशी 'धुरंधर २'चा विक्रम मोडत ९०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश

नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित 'रामायण' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत ९०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला असून, 'पुष्पा २' आणि 'धुरंधर २' नंतर हा टप्पा गाठणारा हा तिसरा सर्वात वेगवान चित्रपट ठरला आहे. प्रदर्शनाच्या १७ व्या दिवशी २७.४० कोटी रुपयांची निव्वळ (नेट) कमाई करून 'रामायण'ने २०२६ मधील ब्लॉकबस्टर 'धुरंधर २' चा २५.६५ कोटींचा विक्रम मोडीत काढला आहे; चित्रपटाची एकूण निव्वळ कमाई ९०६.९० कोटी रुपये तर एकूण ग्रॉस कमाई १०८३.७० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत असून यश, रवि दुबे, अरुण गोविल, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंह आणि विवेक ओबेरॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत, तसेच या चित्रपटाचा दुसरा भाग २०२८ मध्ये प्रदर्शित होणार असून त्यात राम आणि रावण यांच्यातील युद्ध दाखवले जाईल.

Prahaar Marathi News Live Updates : युजवेंद्र चहलचा भाजपमध्ये प्रवेश; ओबीसी मोर्चात मोठी जबाबदारी

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल याने शनिवारी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला असून त्याची भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 'विशेष निमंत्रित सदस्य' म्हणून दिल्लीतून निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नवीन यादीत चहलसह ओडिशाचे अद्वैत चरण गणनायक आणि उत्तर प्रदेशच्या वकील सीमा समृद्धी कुशवाह यांचाही विशेष निमंत्रित म्हणून समावेश आहे. या निवडीबद्दल चहलने 'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरपाल मौर्य यांचे आभार मानले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >