सारा तेंडुलकर आणि राजवीर देओलच्या लग्नाची चर्चा! 2027 मध्ये विवाह होणार?
क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सारा आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा राजवीर देओल यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर साराच्या लग्नाबद्दल बोलले जात आहे.
November 22, 2026 04:17 PM

सारा चर्चेचा विषय बनण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही ती तिच्या चाहत्यांच्या आकर्षणाचे केंद्र बनली होती. इतकंच नाही, तर सारा-राजवीर 2027 मध्ये लग्न करणार असल्याचा दावा काही व्हायरल पोस्टमधून केला जात आहे.
याआधी सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचे नावही अनेक वर्षांपासून एकत्र जोडले जात आहे. लंडनमधील एका रेस्टॉरंटमधून त्यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये लक्षणीय साम्य आढळल्यानंतर त्यांच्या कथित नात्याच्या अफवा सुरू झाल्या. मात्र, त्यांनी असे वृत्त सातत्याने नाकारले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये राजवीर देओल सारा तेंडुलकरला महागड्या भेटवस्तू देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. (photo: X)
याशिवाय साराची भावजय सानिया चंडोक हिच्या कथित कमेंटचाही या चर्चांशी संबंध जोडला जात आहे. या सर्व गोष्टींमुळे सारा आणि राजवीर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.
दरम्यान, सारा तेंडुलकर किंवा राजवीर देओल यांच्यापैकी कुणीही त्यांच्या नात्याबद्दल अथवा लग्नाच्या चर्चांबद्दल अधिकृतपणे प्रतिक्रिया दिलेली नाही.