
आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने आता रंजक वळणावर आले आहे. गट अ मधून श्रीलंका आणि बांगलादेश यांनी उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. तर ब गटातून पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. पाकिस्तानने भारताला 48 धावांनी पराभूत केलं आणि उपांत्य फेरीत जागा पक्की केली. तर दुसऱ्या संघासाठी भारत आणि नेपाळ यांच्यात चुरस आहे. शेवटच्या सामन्यात दोन्ही संघासाठी जर तरचं गणित आहे. भारताचा सामना युएईशी, तर नेपाळचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारत नेपाळ संघाचे प्रत्येकी 2 गुण आहेत. शेवटच्या सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघ उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रयत्नशील असतील. भारताकडे उपांत्य फेरी गाठण्याची सर्वाधिक संधी आहे.
भारत 'ए' विरुद्ध युएई सामना भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होईल?
युएई विरुद्ध भारत 'ए' संघ, आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 सामना 24 नोव्हेंबर (मंगळवार) रोजी खेळला जाणार आहे. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 11.30 वाजता सुरू होईल.
कतारमधील कोणत्या मैदानावर युएई आणि इंडिया 'ए' यांच्यातील लढत रंगणार आहे?
एशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मधील युएई विरुद्ध इंडिया 'ए' संघामधील सामना कतारमधील दोहा येथील दोहा युनिव्हर्सिटी फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे.
भारत 'ए' विरुद्ध युएई सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर दाखवला जाणार आहे?
युएई विरुद्ध भारत 'ए' संघ यांच्यातील आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर उपलब्ध असेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर कर्णधार शुभमन गिलने घेतलेला हा ...
भारत 'ए' विरुद्ध युएई सामना मोबाईल किंवा लॅपटॉपवर ऑनलाइन कसा पाहावा?
युएई विरुद्ध इंडिया 'ए', आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
दोन्ही संघांचे खेळाडू
भारत 'ए' चा संपूर्ण संघ: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विप्रज निगम, हर्षित राणा, प्रिन्स यादव, हर्ष दुबे, प्रभसिमरन सिंग, तनुश कोटियन, अर्शद खान.
युएईचा संपूर्ण संघ: आर्यांश शर्मा, अंश टंडन, हरप्रीत सिंग भाटिया, मुहम्मद शाहदाद, एम. आफताब आलम (यष्टीरक्षक), बासिल हमीद (कर्णधार), एथन डिसूझा, नूरुल्लाह अयोबी, उदिश सुरी, इब्रार अहमद, मुहम्मद मोहसिन, सोहेब खान, ओमिद रहमान, जाहिद अली, अयान मिस्बाह, अवैस अली शाह.






