मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह स्टेडियमवर खेळला जात आहे. पाचव्या दिवसाच्या खेळाच्या दुसऱ्या सत्राच्या अखेरीस, न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावात 5 गडी गमावून 206 धावा केल्या होत्या आणि टीम इंडियाला हरवण्यासाठी न्युझीलंडला 146 धावा करणे महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत, भारतीय संघाला हा कसोटी सामना जिंकण्यासाठी उर्वरित सत्रात आणखी 5 विकेट घेणे आवश्यक आहे. अशातच हा सामना अनिर्णित म्हणजे, ड्रॉ होण्याची शक्यता आहे.
वेलिंग्टन कसोटीच्या पाचव्या दिवसातील पहिल्या सत्रामध्ये न्युझीलंड टीममधील दोन खेळाडू आऊट झाले. टीम इंडियाच्या धडक गोलंदाजीने डेवॉन कॉन्वे आणि रचिन रविंद्र बाद झाले. दुसऱ्या डावात फलंदाजीत सुधारणा दाखवलेल्या कॉनवेला 65 धावा करून वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. त्यानंतर रचिन रवींद्र 37 धावांवर प्रसिद्ध कृष्णाने कॅच घेत, आऊट केलं. अर्धा संघ बाद झाल्यानंतर, डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स या जोडीकडून सामना ड्रॉ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जर सामना ड्रॉ झाला तर, टीम इंडियाला WTC गुणतालिकेमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
ASIA CUP 2026, IND vs PAK Highlights: तिलक वर्माची खेळी व्यर्थ, टीम इंडियाचा 48 धावांनी पराभव
आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत क्रीडाप्रेमींना हायव्होल्टेज सामना पाहायला मिळाला. खरं तर हा सामना भारताच्या हातून गेला. मात्र कर्णधार तिलक ...
पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात न्यूझीलंडचा खेळाडू टॉम ब्लंडेल आऊट झाला. जो 15 धावांवर अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या ग्लेन फिलिप्सने, पहिल्या डावात शतक झळकावले होते. डॅरिल मिचेलसोबत सावधपणे फलंदाजी केली आणि या दोघांनी आता सामना अनिर्णित राखण्याच्या दिशेने वळवला आहे. मिचेल आणि फिलिप्सने सहाव्या विकेटसाठी केवळ 30 धावांची भागीदारी केली, पण त्यासाठी त्यांना एकूण 114 चेंडूंचा सामना करावा लागला.