भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत अलिबाग येथील किहीम गावातील जमीन व्यवहारांचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. किहीम गावात संजय राऊत यांच्या कुटुंबीयांच्या नावावर झालेल्या 10 जमीन व्यवहारांचे सातबारे आणि गट क्रमांकांसह विविध तपशील त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. एका वृत्तवाहिनीने गावात जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर या व्यवहारांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आल्याचा दावा करत नवनाथ बन यांनी या संपूर्ण प्रकरणावर संजय राऊत यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा, असे आव्हान दिले.
राहुल नार्वेकरांवरील टीकेमागे राजकीय आकस?
संजय राऊत आणि उबाठा गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर होत असलेल्या टीकेला नवनाथ बन यांनी राजकीय द्वेषाची किनार दिली. शिवसेनेतील पक्षफुटीच्या प्रकरणात कायदेशीर तरतुदी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे विधिमंडळातील मूळ आणि अधिकृत पक्ष कोणता, याबाबत राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला. तेव्हापासून त्यांच्यावर सातत्याने टीका केली जात असून राऊत यांच्या मनात निर्माण झालेल्या राग व आकसातूनच त्यांना अडचणीत आणण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप बन यांनी केला.
शेतकरी मदतीवरून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक तुलना
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीवरून टीका करणाऱ्या सतेज पाटील यांना नवनाथ बन यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या कारभाराची आठवण करून दिली. कोल्हापूर मतदारसंघ कर्नाटकच्या सीमेजवळ असल्याने त्यांनी तेथील शेतकऱ्यांची स्थिती आणि मदतीची माहिती घ्यावी, असे बन म्हणाले. महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 5,000 रुपये अग्रीम मदत आणि कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला, तर कर्नाटकात काँग्रेस सरकारच्या काळात केवळ 2,500 रुपयांची अंतिम मदत मिळाल्याचा दावा त्यांनी केला. महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातील शेतकऱ्यांनाही 5,000 रुपये आणि कर्जमाफी मिळावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी राहुल गांधींकडे पत्राद्वारे करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
Amit Shah : पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट : भाजप आणि अकाली दल पुन्हा एकत्र; अमित शहा-सुखबीर बादल यांच्या पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा
चंदीगड : पंजाबच्या राजकारणातून आजची सर्वात मोठी आणि निर्णायक बातमी समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिरोमणी ...
सिंघवींच्या 80 लाख फी आणि चार्टर खर्चाचा हिशेब मागितला
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या न्यायालयीन प्रकरणातील सुनावणीसाठी सतेज पाटील यांनी ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांना 80 लाख रुपये फी दिल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला. सिंघवी यांना दिल्लीहून छत्रपती संभाजीनगरला आणण्यासाठी विशेष चार्टर विमानाची व्यवस्था करण्यात आली आणि त्यावर 1 कोटी रुपये खर्च झाल्याचा मुद्दा उपस्थित करत हा पैसा नेमक्या कोणत्या खात्यातून खर्च झाला, याचा हिशेब जनतेसमोर मांडावा, अशी मागणी त्यांनी केली.
हा खर्च सतेज पाटील यांनी वैयक्तिक केला, गोकुळच्या निधीतून केला की अन्य कोणत्या खात्यातून तरतूद झाली, याचे स्पष्टीकरण देण्याचे आव्हान बन यांनी दिले. सरकारी पॅनेलवरील वकिलांना शासनाच्या नियमांनुसार फी दिली जाते, मात्र गोकुळसारख्या संस्थेशी संबंधित प्रकरणात एवढा मोठा खर्च होत असेल तर त्याच्या स्रोताबाबत पारदर्शकता असायला हवी, असे ते म्हणाले. वकिली फी आणि चार्टर विमानाऐवजी ही रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरता आली असती, असा टोलाही त्यांनी लगावला.