
इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी भारत सरकारच्या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारत हेव्ही इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अर्थात BHEL ने २०० इंजिनिअर ट्रेनी आणि एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. ही भरती मोहीम मेकॅनिकल, इलेक्टिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ह्युमन रिसोर्सेस आणि फायनान्स या शाखांमधील तरुण व्यावसायिकांसाठी खुली आहे. पदासाठीच्या विशिष्ट पात्रता निकषांनुसार, अभियांत्रिकी पदवीधर, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट आन पात्र मानव संसाधन व्यावसायिक अर्ज करू शकतात.
अर्ज प्रक्रिया २५ नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि पात्र उमेदवार २८ डिसेंबरपर्यंत BHEL च्या अधिकृत वेबसाईट careers.bhel.in वरून आपले अर्ज ऑनलाइन सादर करू शकतात. उमेदवारांनी अर्जाच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि त्यांचे अर्ज यशस्वीरीत्या सादर झाले आहेत याची खात्री करावी, तसेच त्यांनी लागू असलेले अर्ज किंवा प्रक्रिया शुल्क यशस्वीरीत्या भरले आहे याचीही खात्री करावी, असा सल्ला उमेदवारांना देण्यात आला आहे. संगणक आधारित परीक्षा (CBE) २७ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. सविस्तर अधिसूचनेनुसार, या तारख्या तात्पुरत्या असून त्यात बदल केला जाऊ शकतो. कोणतेही बदल किंवा पुढील माहिती BHEL च्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केली जातील.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) योजनेत मोठे आणि दिलासादायक बदल ...
BHEL निवड प्रक्रिया
- इंजिनिअर ट्रेनी आणि एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठीच्या निवड प्रक्रियेमध्ये संगणक आधारित परीक्षेचा समावेश असेल. यांच्या CBE गुणांवर आणि भरतीच्या आवश्यकतांनुसार आधारित उमेदवारांना गुणवत्तेनुसार मुलाखतींसाठी निवडले जाईल.
- प्रत्येक शाखा आणि प्रवर्गातील रिक्त जागांच्या संख्येनुसार निवड करण्याचे प्रमाण १:५ असेल.
- बेंचमार्क दिव्यांग उमेदवार (PwBD) शॉर्टलिस्टिंगसाठी संबंधित प्रवर्गाच्या कट-ऑफ गुणांपेक्षा २५% गुणांची सवलत मिळण्यास पात्र असतील. तथापि, किमान पात्रता गुण UR/EWS उमेदवारांसाठी ३०% आणि OBC (नॉन-क्रिमी लेयर), SC, आणि ST उमेदवारांसाठी २२.५% असतील.
- संगणक आधारित परीक्षेत विहित किमान पात्रता गुणांपेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेतून अपात्र ठरवले जाईल.






