
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नातवाने कॉग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना कायदेशीर नोटीस पाठवून त्यांच्या 'बिलॉंगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या आत्मचरित्रातील स्वातंत्र्यसैनिकांच्या उल्लेखांवरून बिनशर्त माफी, स्पष्टीकरण आणि दुरुस्तीची मागणी केली आहे. हा उल्लेख म्हणजे त्यांच्या जीवनाचे आणि विचारधारेचे विकृत चित्रण असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सात्यकी सावरकर यांच्या वतीने वकील सम्राट कोल्हटकर यांनी जारी केलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक २०१ आणि ४४३ वरील विधानांवर आक्षेप घेण्यात आला आहे. ही विधाने वस्तुस्थितीला धरून नसलेली, ऐतिहासिकदृष्ट्या दिशाभूल करणारी आणि व्ही. डी. सावरकर यांच्या प्रतिष्ठेला व वारशाला बाधा आणणारी असल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे.
या नोटीसमध्ये सोनिया गांधी यांना ती मिळाल्यापासून मागण्यांचे पालन करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पालन करण्यात अपयश आल्यास किंवा नकार दिल्यास, सात्यकी सावरकर योग्य कायदेशीर कारवाई सुरू करू शकतात आणि सक्षम न्यायालय किंवा प्राधिकरणाकडे दाद मागू शकतात, असे त्यात म्हटले आहे. या सूचनेत पुस्तकाच्या पान क्रमांक २०१ वरील उताऱ्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. या पानावर इंग्रजीमध्ये असे लिहिले आहे की, 'एकीकडे काँग्रेसचे स्वातंत्र्यसैनिक ब्रिटिश शासकांकडून होणारे हल्ले आणि तुरुंगवास सहन करत होते, तर दुसरीकडे विनायक दामोदर सावरकरांसारखे राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत आपल्या वसाहतवादी सत्ताधार्यांकडे दयेचे अर्ज लिहित होते आणि त्यांचे सदस्य खबऱ्यांच्या रूपात ब्रिटिश अधिकाऱ्यांशी संगनमत करत होते.' या सोबतच पान क्रमांक ४४३ वरील एका मजकुरावर देखील आक्षेप नोंदवण्यात आला आहे. यामध्ये सावरकरांच्या भारताच्या संकल्पनेचे चुकीचे चित्रण करून त्यांच्या राजकीय आणि वैचारिक तत्त्वज्ञानाचे चुकीचे चित्रण केले आहे.
नाशिक : रेल्वे प्रवासादरम्यान झालेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. इगतपुरी रेल्वे स्थानक परिसरात पंचवटी ...
नोटीसनुसार, पान क्रमांक २०१ वरील विधानामुळे असा समज निरमा होतो की, सावरकर हा भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी माहिती देण्याशी किंवा त्यांच्याविरुद्ध ब्रिटिश अधिकाऱ्यांशी संगनमत करण्यात सहभागी होते. यामध्ये पुढे असे म्हटले आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिश वसाहतवादी राजवटीत दीर्घ तुरुंगवास आणि तीव्र हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. त्यांच्या तुरुंगवासादरम्यान सादर केलेल्या याचिकांचे संदर्भ, परिस्थिती, ऐतिहासिक पार्श्वभूमी यांचा अभ्यास न करता त्यांच्या जीवनाचे अपूर्ण आणि विकृत चित्र सादर केले आहे असा आरोप त्यांनी केला आहे.






