
शेतकरी कायद्यांमुळे २०२० मध्ये तुटले होते नाते
भाजप आणि अकाली दल यांची मैत्री अनेक दशकांची होती. मात्र, सप्टेंबर २०२० मध्ये केंद्र सरकारने आणलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांवरून दोन्ही पक्षांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आणि अकाली दलाने भाजपची साथ सोडली होती. पुढे देशभरातील शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्र सरकारने हे तिन्ही कायदे रद्द केले. कायदे मागे घेतल्यानंतर दोन्ही पक्षांतील दुरावा कमी होऊ लागला होता आणि नेतेही पुन्हा एकत्र येण्याचे संकेत देत होते. स्वतः गृहमंत्री अमित शहा यांनीही पंजाबमध्ये पुढचे सरकार 'एनडीए'चेच (NDA) बनेल, असे वक्तव्य करून या युतीचे स्पष्ट संकेत दिले होते.#WATCH | Delhi: Formally announcing the Bharatiya Janata Party (BJP)–Shiromani Akali Dal (SAD) alliance for the 2027 Punjab Assembly elections, Union Home Minister Amit Shah says, "Under the leadership of our National President, a meeting just concluded in his room today, in which prominent leaders of both the Shiromani Akali Dal (SAD) and the Bharatiya Janata Party (BJP) sat together and took a decision that the next Punjab Legislative Assembly election will be contested jointly by the BJP and the Akali Dal, and from today, the Akali Dal will function in politics as an official partner of the NDA."
— ANI (@ANI) November 24, 2026






