सॅन जुआन : यंदाच्या 75 व्या Miss Universe सौंदर्यस्पर्धेचे विजेतेपद प्यूर्टो रिकोच्या जेनिफर बॅरेटो हिने पटकावले आहे. 24 November रोजी सॅन जुआन येथील कोलिसेओ दे प्यूर्टो रिको होजे मिगुएल अॅग्रेलोट स्टेडियममध्ये झालेल्या भव्य सोहळ्यात तिने हा प्रतिष्ठित किताब जिंकला. जगभरातील 115 स्पर्धकांना मागे टाकत जेनिफरने यशाची मोहर उमटवली. स्पर्धेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त विजेत्यासाठी खास मुकुट साकारण्यात आला होता. तब्बल 3,150 हिरे जडवलेला हा मुकुट 18 कॅरेट व्हाइट गोल्डपासून तयार केला गेला आहे.
GTA 6 मध्ये 44 वर्षांपूर्वीचं बंगाली गाणं! 'आज शनिवार'मुळे गायिका रुपा बिस्वास यांना ग्लोबल ओळख
मुंबई : तब्बल 44 वर्षांपूर्वी रिलीज झालेलं बंगाली डिस्को गाणं आज पुन्हा जगभर चर्चेत आलं आहे. 1982 मध्ये रिलीज झालेलं गायिका रुपा बिस्वास सेन यांचं 'आज ...
मायदेशात 20 वर्षांचा दुष्काळ संपला
आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर मिळालेल्या या विजयामुळे प्यूर्टो रिकोने 6 व्यांदा Miss Universe चा किताब जिंकत मोठा विक्रम नोंदवला. यापूर्वी 1970 मध्ये मारिसोल मालारेट, 1985 मध्ये डेबोरा कार्थी-ड्यू, 1993 मध्ये दयानारा टोरेस, 2001 मध्ये डेनिस क्विनोनेस आणि 2006 मध्ये झुलेयका रिवेरा यांनी प्यूर्टो रिकोला हा सन्मान मिळवून दिला होता. या ऐतिहासिक विजयामुळे प्यूर्टो रिकोचा तब्बल 20 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपला आहे.
सॅन सेबॅस्टियनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 27 वर्षीय जेनिफरचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरला. तिने February 2026 मध्येच रॅम्पवर पहिले पाऊल ठेवले आणि June मध्ये ती Miss Universe Puerto Rico 2026 ठरली. स्पर्धांचा फारसा अनुभव नसतानाही तिने पहिल्या 5 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवून सर्वांनाच चकित केले. विशेष म्हणजे ती विवाहित असून तिला पेनेलोप नावाची 7 वर्षांची मुलगी आहे.
धक्कादायक खुलासा! कांगच्या वादापूर्वीच 'डॉक्टर डूम' होता मार्व्हलचा मास्टरप्लॅन? रॉबर्ट डाउनी ज्युनियरच्या एन्ट्रीमागचे गुपित उघड!
Avengers Doomsday : मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स मधील 5 वा अॅव्हेंजर्स चित्रपट 'ॲव्हेंजर्स: डूम्सडे' प्रदर्शित होण्यासाठी अवघ्या 1 महिन्यापेक्षा कमी काळ उरला ...
समाजकार्य आणि भारताची कामगिरी
जेनिफरने मानसशास्त्र आणि समाजकार्य विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. 2021 पासून तिने टेक्सासमधील फोर्ट कावाझोस येथे अमेरिकन लष्कराच्या कुटुंब कल्याण कार्यक्रमात काम करत घरगुती हिंसाचार आणि बाल अत्याचार पीडितांना मोठा आधार दिला. तसेच, तिने कार्ल आर डार्नल आर्मी मेडिकल सेंटरमध्ये स्वयंसेवक म्हणूनही काम केले. या जागतिक मंचाचा वापर समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि लोककल्याणाचे काम पुढे नेण्यासाठी करणार असल्याचे तिने सांगितले.
अंतिम फेरीत डोमिनिकन रिपब्लिकची मेलिसा नुनेझ ही 1 ली उपविजेती ठरली, व्हेनेझुएलाची क्लारा वेगास गोएट्झ 2 री उपविजेती ठरली, तर फिलीपिन्सची बी मिलान-विंडोर्स्की 3 री उपविजेती ठरली. यंदा जगभरातील 116 देश आणि प्रदेशांतील स्पर्धकांमध्ये या किताबासाठी चुरस होती. केरळची 19 वर्षीय काझिया लिझ मेजो हिने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि पहिल्या 30 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले, मात्र तिला पहिल्या 12 मध्ये आगेकूच करता आली नाही.