
सोने आणि चांदीच्या दरातील घसरण सुरूच आहे. मंगळवारी मोठी घसरण झाल्यानंतर मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर वायदे व्यवहार सुरू होताच बुधवारी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी घसरण झाली. चांदीचा भाव प्रति किलो ३,५०० रुपयांपेक्षा जास्त घसरला असून तो उच्चांकी भावापेक्षा २.७८ लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे. दरम्यान, सोने त्याच्या उच्चांकी भावापेक्षा प्रति १० ग्रॅम ७०,००० रुपयांपर्यंत घसरले आहे. फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये चांदीच्या किमतीतील सततच्या घसरणीकडे पाहिल्यास मंगळवारी सायंकाळच्या सत्रात या मौल्यवान धातूची किंमत सुमारे ९००० रुपयांनी कोसळली आणि बुधवारीही ई घसरण सुरूच राहिली. ४ डिसेंबर रोजी मुदत संपणाऱ्या चांदीची किंमत आदल्या दिवसाच्या १,४५,४३८ रुपयांच्या बंद भावावरून घसरून १,४१,८५६ रुपयांवर आली. याचा अर्थ एकाच झटक्यात चांदी ३५८२ रुपयांनी स्वस्त झाली.
२०२६ मध्ये चांदीच्या हालचालींमध्ये मोठे बदल दिसून आले आहेत. सुरुवातीला, जानेवारी महिन्यात आपले सर्व विक्रम मोडून चांदीच्या किमतीने प्रथमच ४ लाख रुपयांचा ऐतिहासिक स्तर ओलांडला आणि ४,२०,०४८ रुपये प्रति किलो या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. तथापि, या प्रचंड वाढीला खीळ बसली आणि त्यानंतर चांदी कोसळू लागली. सध्याच्या किमतीशी तुलना केल्यास एमसीएक्सवर १ किलो चांदी २,७८,१९२ रुपयांनी स्वस्त मिळत आहे. केवळ चांदीचेच नाही तर मौल्यवान अशा सोन्याचेही भाव वरखाली होताना दिसले.
Pune Shivajinagar Court Firing : पुण्यात शिवाजी नगर येथे कोर्टाबाहेर भरदिवसा गोळीबाराची घडना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोर्टाबाहेर गोळीबार करत ...
२४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव बुधवारी (२५ नोव्हेंबर) १.२० लाख रुपयांपर्यंत घसरला. आदल्या दिवशीच्या सायंकाळच्या सत्रात सोन्याचा दर १,२२,३२९ रुपयांवर बंद झाला होता आणि आता तो १,९८३ रुपयांनी स्वस्त होऊन प्रति १० ग्रॅम १,२०,३४६ रुपयांवर आला आहे. या सोन्याच्या किमतीतील घसरणीची तुलना सोन्याच्या जीवनकाळातील उच्चांकी दराशी केली तर आता हे सोने एमसीएक्सवरील सुमारे १.९३ लाख रुपयांच्या उच्चांकी दरापेक्षा प्रति तोळा ७०,००० रुपयांपेक्षा जास्त स्वस्त मिळत आहे.
मंगळवारी गुरू नानक जयंतीनिमित्त सकाळच्या सत्रात व्यापार बंद होता, तर सायंकाळच्या सत्रात कमोडिटी ट्रेडिंग झाले आणि सायंकाळी ५ वाजल्यापासून वायदे बाजार बंद होईपर्यंत सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच राहिली. यापूर्वी सोमवारी, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२५,९९६ रुपये होता जो घसरून १,२२,३२९ रुपये झाला. याचा अर्थ सोने ३,६६७ ने स्वस्त झाले. त्याचप्रमाणे सोमवारी १,५४,२१७ रुपयांवर बंद झालेले चांदीची भाव मंगळवारच्या सायंकाळच्या सत्रात १,४५,४३८ रुपयांपर्यंत कोसळले. परिणामी चांदी प्रति किलोग्रॅम ८,७७९ रुपयांनी स्वस्त झाली.






