मुंबईची मैदानं मुंबईकरांचीच! खासगीकरणाचा धोरण मसुदा मागे घेण्याचे पालकमंत्री आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

मुंबईतील मैदानं आणि उद्यानं खासगी संस्थांच्या ताब्यात देणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रालयातील बैठकीत घेण्यात आला.

मुंबईची मैदाने आणि उद्यानं ही मुंबईकरांच्या हक्काची आहेत. ती कोणत्याही खासगी संस्थेच्या ताब्यात जाणार नाहीत, असा ठाम निर्णय आज मंत्रालयातील बैठकीत घेण्यात आला. पालकमंत्री आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिकेला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. 2023 साली तयार केलेला मैदाने खासगी संस्थांना देण्याचा धोरणाचा मसुदा मागे घ्या आणि सर्व मैदानं महापालिकेनेच विकसित करून सांभाळा, असं त्यांनी सांगितलं. मंत्र्यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला महापौर रितू तावडे, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


मुंबईत सध्या 1123 खेळाची मैदानं आणि 343 उद्यानं आहेत. यातली बहुतेक मैदानं आणि उद्यानं महापालिकाच सांभाळते. फक्त 15 मैदानं आणि 7 उद्यानं सध्या खासगी संस्थांकडे देखभालीसाठी आहेत. जुन्या धोरणानुसार दिलेल्या 11 मैदानांच्या काळजीवाहू कराराची आणि 18 मैदानांच्या दत्तक कराराची मुदतही संपली आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली. या बैठकीत महापौर आणि आमदार अमित साटम यांनी खासगीकरणाला ठाम विरोध केला. मैदानं ही मुंबईकरांची मालमत्ता आहे. महापालिकेनेच तिथे चांगल्या सुविधा आणि सुरक्षा द्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. हा विषय अनेक वर्षांपासून रखडला आहे, त्यावर पुढच्या 60 दिवसांत निर्णय घ्या, अशी मागणी साटम यांनी केली. त्याला मंगलप्रभात लोढा यांनीही पाठिंबा दिला.






त्यावर आयुक्तांनी देखभाल आणि सुरक्षेसाठी निधी आणि मनुष्यबळ अपुरं असल्याचं सांगितलं. मात्र सीएसआर निधीतून हा खर्च भागवता येईल, असं त्यांनी सुचवलं. यासाठी एक स्वतंत्र समिती बनवण्याची सूचना लोढा यांनी केली. शेवटी पालकमंत्री आशिष शेलार यांनी महत्त्वाचे निर्देश दिले. मैदानं विकसित करताना वेगवेगळ्या खेळांचा विचार करा. चालण्यासाठी, जॉगिंगसाठी सुविधा द्या. पहिल्या टप्प्यात काही निवडक मैदानं आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवा आणि ते मॉडेल मुंबईकरांसमोर ठेवा. सीएसआर निधीसाठी महापालिकेने सार्वजनिक आवाहन करावं, असंही त्यांनी सांगितलं. एकूणच, मुंबईची मोकळी जागा मुंबईकरांचीच राहणार, असे या बैठकीत सांगण्यात आले.

Comments
Add Comment

मुंबई पुस्तक महोत्सवात गौतम अदानींची उपस्थिती! पुस्तकांतून शिकून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्या, विद्यार्थ्यांना आवाहन

[caption id="attachment_1079151" align="aligncenter" width="800"] मुंबई विद्यापीठ परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उद्योगपती

पनवेल- कर्जत लोकल प्रवासाचा मार्ग मोकळा! 15 डिसेंबरपासून महत्त्वाची ट्रायल पार पडणार

मुंबई: कर्जत- पनवेल मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 29.6 किमी लांबीच्या पनवेल- कर्जत मार्गिकेच्या

रात्री शोरमाची मेजवानी, सकाळी रुग्णालयाची पायरी! गर्भवती महिला, चिमुकल्यांसह 34 जणांना विषबाधा

बाहेरचे खाद्यपदार्थ खाताना स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणं किती महत्त्वाचं आहे, हे पुन्हा एकदा

'मुंबई पुस्तक महोत्सव' संवेदना आणि माणुसकीचा उत्सव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात तंत्रज्ञानाचा वेग वाढत असला, तरी मानवी संवेदना, प्रेम आणि भावभावना

मुंबईत भारत-सायप्रस सागरी व्यवसाय मंच; जहाज बांधणी, हरित नौवहनात सहकार्यावर भर

सायप्रस प्रजासत्ताकाच्या नौवहन उपमंत्री मरीना हाजीमानोलिस यांच्या भारत दौऱ्याच्या निमित्ताने आज मुंबईत

Mission Pedestrian First: महापालिका आयुक्तांच्या ‘मिशन पेडेस्ट्रियन फर्स्ट’लाच अधिकारीच घालतात खिळ?

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पदपथावरील अतिक्रमण हटवले जाते, पादचारी मुक्त झाले पदपथ बनवले जातात, पण काही दिवसांतच