
Pune Mangesh Kiwale Case: पुण्यातील शिवाजीनगर परिसरात कोर्टाच्या बाहेर काल (25 नोव्हेंबर) सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर तीव्र हत्यारांनी वार केला. न्यायालयाच्या परिसरात झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. मंदार मारुती किवळे वय वर्षे 35 असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हा प्रकार न्यायालयासमोरील रस्त्यावर दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास घडला. दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी किवळे याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. पिस्तुलातून "मिस फायर" झाल्यामुळे त्याला गोळी लागली नाही. मात्र हल्लेखोरांनी त्यांच्या जवळील असलेल्या कोयत्याने मंदार किवळेवर वार केले. हे वार इतके तीक्ष्ण होते की किवळे याचे दोन्ही हात जवळपास शरीरापासून वेगळे झाले होते. हल्ला केल्यानंतर तात्काळ हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किवळे याला स्थानिकांनी पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
2025 मध्ये पुण्याच्या कात्रज भागात शुभम चव्हाण या तरुणाचा खून करण्यात आला होता. मालमत्तेच्या वादातून लाकडी ओंडके आणि बांबूच्या काठ्यांनी त्याला मारहाण करून शुभम चव्हाण याचा खून करण्यात आल्या होता. या प्रकरणी चार जणांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली होती. कात्रज भागातील संतोष नगर येथील शुभम चव्हाण हा रहिवासी होता. तसेच त्याचे त्या भागात एक रेस्टॉरंट सुद्धा होते. घराशेजारील जमिनीवरुन शुभम चव्हाण आणि अमर साकोरे नावाच्या तरुणासोबत त्याचा वाद झाला होता. त्या वादातूनच चौघा जणांनी लाकडी बांबु, स्टंप घेऊन शुभम चव्हाण याला मारहाण करुन त्याचा खुन केला. चव्हाण याचा खुन केल्यानंतर आरोपी पळून गेले होते. मात्र या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी आरोपी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती येथून ताब्यात घेतले होते. त्यात मंदार किवळे याचा समावेश होता. शुभम चव्हाण याचा भाऊ आणि मित्र यांनी शपथ घेतली होती. शुभमच्या हत्येचा बदला घेणार, असा निर्धार भावाने केला होता आणि या प्रकरणातील आरोपी मंदार केवळे तुरुंगातून बाहेर येताच त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात भरदिवसा घडलेल्या कोयता हल्ल्याच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दोन गटांमधील वादाचे रूपांतर हिंसक ...
शुभम चव्हाण याच्या हल्ल्याला एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेला. मात्र या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी चव्हाण आणि त्याचे सहकारी यांनी आधीच प्लॅन करायला सुरुवात केली होती. शुभमच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी त्याच्या मारेकऱ्यांना संपवण्याचा डाव आखला. या प्रकरणात आरोपी असलेला मंदार किवळे हा चार ते पाच दिवसांपूर्वीच जामीनावर तुरुंगातून बाहेर आला होता. किवळे हा बाहेर आल्या असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. त्यानुसार त्याच्यावर 1-2 दिवसांपासून आरोपींनी "ट्रॅप" लावला होता. किवळे हा न्यायालीन कामकाजासाठी शिवाजीनगर परिसरात जात असताना दबा धरलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभमचा सख्खा भाऊ अक्षय चव्हाण यानेच संपूर्ण कट रचला असून या कटाची अंमलबजावणी करण्यासाठी त्याने इतर आरोपींना सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर मंदार किवळेवर झालेला जीवघेणा हल्ला बदल्याच्या भावनेनं केलं असल्याची माहिती समोर आली. शुभमचा भाऊ अक्षय चव्हाणने 12 ते 15 तरुणांना एकत्र करून कट रचला होता.
दरम्यान याप्रकरणी आत्तापर्यंत 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. शुभमचा सख्खा भाऊ अक्षय चव्हाण यानेच संपूर्ण कट रचला.






