Home प्रहार ब्लॉग पियानो प्लेअर ते शार्पशूटर

पियानो प्लेअर ते शार्पशूटर

0

गँगस्टर अबू सालेमवर गोळीबार करणारा शूटर देवेंद्र जगताप ऊर्फ जे. डी हा पूर्वाश्रमीचा उत्कृष्ट पियानो प्लेअर होता. जे. डी मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील सावरगावपाट गावचा. त्याचे वडील लष्करातून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी वकिली सुरू केली होती.

गँगस्टर अबू सालेमवर गोळीबार करणारा शूटर देवेंद्र जगताप ऊर्फ जे. डी हा पूर्वाश्रमीचा उत्कृष्ट पियानो प्लेअर होता. जे. डी मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील सावरगावपाट गावचा. त्याचे वडील लष्करातून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी वकिली सुरू केली होती. बीएससीच्या दुस-या वर्गापर्यंतचे शिक्षण घेतलेल्या जे.डीने त्याच्या कारकीर्दीची सुरुवात एका ऑर्केस्ट्रामध्ये पियानो प्लेअर म्हणून केली होती. त्यानंतर पैशाच्या लालसेने त्याचा रिअल इस्टेट दलाल व पुढे शार्पशूटपर्यंत प्रवास सुरू झाला. या प्रवासादरम्यान एस. एस. सिंडिकेटचा गँगस्टर भरत नेपाळीच्या तो फार जवळचा झाला.

भांडुपमधील प्रतापनगर येथील बैठय़ा चाळीत ९ नोव्हेंबर १९८१ रोजी जे.डीचा जन्म झाला. त्याचे एस.वाय.बीएससी पर्यंतचे शिक्षण घाटकोपर येथील झुनझुनवाला महाविद्यालयात झाले. उकृष्ट इंग्रजी बोलणा-या जे.डीला सुरुवातीपासून पियानो वाजवण्याची आवडत होती. त्यामुळे इतर मुलांप्रमाणे नोकरी करण्याऐवजी त्याने ऑर्केस्ट्रामध्ये पियानो प्लेअर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. परंतु या क्षेत्रातील स्ट्रगल व कमी मानधन यामुळे दीड वर्षातच त्याच्यातील कलाकार कुठेतरी हरवला.

त्याने २००४ ला आदिमल्लु, महाप्रब, अंकुश शिंदे यांच्यासोबत २००४ साली रिअल इस्टेटमध्ये दलालीचा व्यवसाय सुरू केला. त्यात चांगला पैसा कमवल्यानंतर पैशासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्याची तयारी होती. त्यामुळे आदिमल्लूचा मित्र व गँगस्टर छोटा राजनचा विश्वासू किरण ढोकरे ऊर्फ बाळू ढोकरे यांच्या संपर्कात तो आला आणि राजन टोळीसाठी जे.डी काम करू लागला. ढोकरे त्यावेळी राजनसोबत मलेशियातून सगळं ‘ऑपरेट’ करत होता. जे.डीही त्यानंतर आदिमल्लूच्या मध्यस्थीने खंडणी गोळा करण्याची कामे करू लागला.

दोन वर्ष जे.डीने स्थानिक बांधकाम व्यावसायिकांना निरोप पोहोचवणे, संदेश घेणे, देणे, मीटिंग करणे आदी कामे केली. त्याच वेळी आदिमल्लूने परस्पर खंडणी गोळा केल्यामुळे ढोकरेशी त्याचे बिनसले व ढोकरेने आदिमल्लूला हटवून जे.डीला म्होरक्या केले. मुलुंड, भांडुप या परिसरातील बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी वसूल करण्याचे काम जे.डीकडे सोपवले. पण आदिमल्लूने विश्वासघात केल्यामुळे ढोकरेला त्याची हत्या करून त्याचा बदला घ्यायचा होता. त्याची जबाबदारी जे.डीला देण्यात आली. पण त्यावेळी जे.डीकडे हत्यार नसल्यामुळे ढोकरेने नाशिकमधील कैलास मुदलियार या त्याच्या पंटरशी जे.डीचा संपर्क करून दिला.

त्यानुसार त्याने कैलास आहेर, संजय जाधव हे दोन शूटरही त्याच्यासोबत पाठवून दिले. जे.डीने आदिमल्लूवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी हसमुख सोलंकी याला दिली. २४ जुलै २००५ हा दिवस आदिमल्लूच्या जीवनाचा शेवटचा दिवस ठरला. मुलुंडमधील योगराज बारमध्ये आदिमल्लूच्या शरीराची अक्षरश: चाळण करण्यात अली. त्यानंतर दहा दिवस नाशिकात थांबल्यानंतर जे.डी पुन्हा मुंबईत परतला. त्यावेळी खर्चासाठी ढोकरने जे.डीला एक लाख रुपये घेऊन अंधेरीत एका माणसाकडे पाठवले होते. त्यावेळी गुन्हे शाखेच्या कक्ष-१० ने रिक्षातून जात असताना पैशांसह जे.डीला अटक केली. जे.डी आर्थर रोड तुरुंगात असताना मलेशियात ढोकरेची छोटा शकीलच्या माणसांनी हत्या केल्याचे समजले.

कारागृहातून बाहेर पडल्यानंतर राजन टोळीतील ढोकरेची जागा भरत नेपाळीने घेतल्याचे जे.डीला समजले. तो नेपाळीच्या संपर्कात राहू लागला. त्यावेळी डिसेंबर २००५ मध्ये जेडी नेपाळीचा खास माणूस कल्लूसिंगला भेटायला ठाणे रेल्वे स्थानकावर गेला. त्यावेळी ठाणे खंडणीविरोधी पथकाने त्याला अटक केली. तिथून जामिनावर सुटका झाल्यावर ऑगस्ट २००८ ला छोटा राजनने फोन करून चेंबूरमधील त्याचा हस्तक अनिल पाटणकरचा गेम करायचा असल्याचे जे.डीला सांगितले. त्यासाठी कृष्णा गौडाकडे एक लाख रुपये व हत्यार पाठवून दिले. पण अनिल पाटणकर ज्या पद्धतीचे कपडे घालतो तसेच कपडे त्याच्या अंगरक्षक संतोष मानेने घातल्यामुळे त्याचा ‘गेम’ झाला.

पुढे भरत नेपाळीने जे.डीवर वकील शाहीद आझमीच्या हत्येची जबाबदारी दिली. त्यानुसार त्याने ८ फेब्रुवारीला आझमीच्या कार्यालयात जाऊन त्याची हत्या केली. जाणकारांच्या मते, संतोष शेट्टीच्या जवळ असलेला जे.डी या चार महिन्यांच्या कालावधीतच छोटा शकीलच्या संपर्कात आला. त्यातून सालेमवर हल्ला करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली. विशेष म्हणजे जे.डीचा गॉडफादर असलेल्या बाळू ढोकरेचा ‘गेम’ छोटा शकीलनेच केला होता. त्यामुळे ‘नथिंग इज परमनंट इन लाइफ’ ही उक्ती अंडरवल्डमध्येही खरी ठरते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version