कीव्ह : रशियाने युक्रेनवर रात्रभर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा आणि इतर ११ जणांचा अशा एकूण १२ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत झेलेन्स्की म्हणाले, "या हल्ल्यात एकूण १२ जणांचा मृत्यू झाला असून त्यात एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. ज्यांनी आपले आप्तस्वकीय गमावले आहेत, त्या सर्वांबद्दल मी तीव्र संवेदना व्यक्त करतो." (Russia Ukraine War)
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६ परीक्षेविरोधात २० ते २५ जुलैदरम्यान ...
झेलेन्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. निवासी इमारती आणि नागरी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. एका पाच मजली निवासी इमारतीचे नुकसान झाले असून तेथून ५० लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. बोरिस्पिल शहरात ४ जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. कीव्ह येथील एका रेल्वे डेपोवर झालेल्या हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू झाला. (Russia Ukraine War)
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अधिसंख्य पदांवरील कर्मचाऱ्यांची माहिती दोन आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश मुंबई : विविध शासकीय विभागांमध्ये ...
ओडेसा शहर आणि परिसरात सततच्या ड्रोन हल्ल्यांमुळे हजारो कुटुंबे अंधारात गेली आहेत. वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. तसेच रोमानियाच्या सीमेवरील चेकपोस्ट आणि निर्यात पायाभूत सुविधांचेही रशियाकडून जाणीवपूर्वक नुकसान करण्यात आले. याशिवाय खेरसॉन, डोनेत्स्क, झापोरिझिया, खारकीव्ह, चेर्निहीव्ह, झितोमायिर, सुमी आणि निप्रो हे प्रदेशही रशियन हल्ल्याच्या कचाट्यात सापडले. (Russia Ukraine War)






