- छगन भुजबळ, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांचा समावेश
मुंबई : ओबीसी महामंडळाला योग्य प्रमाणात निधीची तरतूद केली जात नसल्याचा आरोप करत मंत्री छगन भुजबळ, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांनी मंगळवारी ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर बहिष्कार घातला. या तीनही मंत्र्यांच्या भूमिकेमुळे महायुती सरकारमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. (OBC Cabinet Sub Committee)
- नव्या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ग्रामपातळीपासून मंत्रालयापर्यंत जबाबदाऱ्यांचे वाटप मुंबई : नक्षलमुक्त महाराष्ट्र केल्यानंतर आता ...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी समाज यांच्यातील वाढता संघर्ष दूर करण्यासाठी तसेच ओबीसी समाजातील आर्थिक दरी कमी करण्यासाठी राज्य सरकारने 'ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती'ची स्थापना केली आहे. भाजप नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत छगन भुजबळ, गणेश नाईक, पंकजा मुंडे, संजय राठोड, गुलाबराव पाटील, अतुल सावे आणि दत्तात्रय भरणे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. मात्र, मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या या उपसमितीच्या बैठकीत ओबीसी महामंडळाच्या निधी वाटपावरून नाराजी व्यक्त करत छगन भुजबळ, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड या मंत्र्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. (OBC Cabinet Sub Committee)
- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर पूर्व जकात नाका येथे होत असलेल्या ...
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करत पंधरा दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे. एका बाजूला मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा आक्रमक होत असताना आणि ओबीसी समाजही आंदोलनाची तयारी करत असताना, सरकारमधील मंत्र्यांनीच निधीच्या मुद्द्यावरून उपसमितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याने वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. (OBC Cabinet Sub Committee)






