Friday, September 4, 2026

Priyanka Chopra Karl Lagerfeld Award : ग्लोबल फॅशनविश्वात प्रियांका चोप्राचा डंका! पॅरिसमध्ये प्रदान करणार मानाचा 'कार्ल लेगरफेल्ड पुरस्कार'

Priyanka Chopra Karl Lagerfeld Award : ग्लोबल फॅशनविश्वात प्रियांका चोप्राचा डंका! पॅरिसमध्ये प्रदान करणार मानाचा 'कार्ल लेगरफेल्ड पुरस्कार'

पॅरिस : बॉलिवूड ते हॉलिवूड (Bollywood To Hollywood) असा प्रवास करणारी ‘ग्लोबल आयकॉन’ प्रियांका चोप्रा जोनस (Priyanka Chopra Jonas) हिने आंतरराष्ट्रीय फॅशन जगतात पुन्हा एकदा भारताची मान अभिमानाने उंच केली आहे. पॅरिसमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या अत्यंत मानाच्या 'LVMH Prize 2026' सोहळ्यात प्रियांका एका विशेष भूमिकेत पाहायला मिळणार आहे. फॅशन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा 'कार्ल लेगरफेल्ड पुरस्कार' (Karl Lagerfeld Prize) विजेत्याला प्रदान करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी यंदा प्रियांकावर सोपवण्यात आली आहे.

जेनिफर लॉरेन्ससह जागतिक कलाकारांसोबत मंचावर हजेरी

पॅरिस येथील 'फाउंडेशन लुई व्हिटॉन' (Fondation Louis Vuitton) येथे पार पडणाऱ्या या दिमाखदार सोहळ्यात प्रियांका चोप्रासोबत जगभरातील इतर नामवंत कलाकारही सादरकर्ते (Presenters) म्हणून उपस्थित राहणार आहेत. यात ऑलिवूड अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स (Dior Ambassador) आणि थाई अभिनेत्री उरास्साया 'याया' स्पेरबंद (Urassaya 'Yaya' Sperbund) यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय लक्झरी, फॅशन आणि पॉप कल्चरच्या संगमावर प्रियांकाची ही उपस्थिती जागतिक स्तरावर विशेष लक्षवेधी ठरणार आहे.

काय आहे 'कार्ल लेगरफेल्ड पुरस्कारा'चे वैशिष्ट्य ?

LVMH Prize च्या व्यासपीठावर दरवर्षी फॅशन क्षेत्रातील नव्या आणि उदयोन्मुख डिझायनर्सच्या प्रतिभेचा सन्मान केला जातो. यंदा नऊ डिझायनिंग ब्रँड्स अंतिम फेरीत पोहोचले असून, त्यात 'LVMH Prize', 'Karl Lagerfeld Prize' आणि 'Savoir-Faire Prize' या तीन श्रेणींमध्ये तीव्र चुरस पाहायला मिळणार आहे. प्रियांका चोप्रा ज्या 'कार्ल लेगरफेल्ड पुरस्काराचे' वितरण करणार आहे, त्या विजेत्या डिझायनरला २ लाख युरोचे आर्थिक अनुदान आणि LVMH च्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून एका वर्षाचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

ग्लोबल फॅशन जगतात प्रियांकाचा वाढता दबदबा

बुलगारी (Bulgari) आणि Dior सारख्या जागतिक लक्झरी ब्रँड्सची ब्रँड अँम्बेसेडर म्हणून काम करणाऱ्या प्रियांकाचा आंतरराष्ट्रीय फॅशन जगतात मोठा प्रभाव आहे. जागतिक पातळीवरील प्रमुख फॅशन शो आणि रेड कार्पेट इव्हेंट्स गाजवल्यानंतर, आता थेट पॅरिसमधील या नामांकित पुरस्कार सोहळ्यात सन्माननीय सादरकर्ता म्हणून तिची झालेली निवड ही तिच्या जागतिक कारकिर्दीतील आणखी एक मोठी आणि महत्त्वाची उपलब्धी मानली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >