Saturday, September 5, 2026

Dahi Handi 2026 : मुंबईत तब्बल १६८ गोविंदा जखमी

Dahi Handi 2026 : मुंबईत तब्बल १६८ गोविंदा जखमी

मुंबईत शहरातच तब्बल १०६गोविंदा जखमी

तब्बल२९ जखमी गोविंदांना रुग्णालयांत दाखल करण्याची आली वेळ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ढाक्कू माक्कूम, ढाक्कू माक्कूम....बोल बजरंग बली की जय…., गोविंदा रे गोपाळा… या गाण्यावर थिरकत थरांवर थर रचत शनिवारी मुंबईतील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न विविध गोविंदा मंडळांनी केला. मात्र, हंडी फोडण्यासाठी थरांवर थर रचताना काहींचे मनोरे कोसळून त्यातील गोविंदा जखमीही झाले आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिका आणि शासकीय रुग्णालयंमध्ये तब्बल १६८ जखमी गोविंदा दाखल झाले होते. यातील २९ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर उर्वरीतांपैंकी ८१ जवानांवर उपचार सुरु होते आणि ५८ गोविंदांवर उपचार करून सोडून देण्यात आले होते.(Dahi Handi 2026)

मुंबई महानगरीची एक महत्त्वाची सांस्कृतिक ओळख असणा-या दहीहंडीच्या कार्यक्रमात गोविंदा जखमी होण्याचे प्रकार घडू शकतात, ही संभाव्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय, परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालय आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच १६ उपनगरीय रूग्णालयातही १०५ रूग्णशय्या सज्ज ठेवण्यात आले आहेत. या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ५ ते १० खाटांची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली होती. शनिवारी सकाळपासून मुंबईतील विविध भागांमध्ये मंडळांनी तसेच राजकीय व्यक्तींनी बांधलेल्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथके गाड्यांनी रवाना झाली होती. त्यामुळे संपूर्ण मुंबईत गोविंदांचा दर्शन घडत उंच लावलेल्या हंडया फोडण्यासाठी प्रत्येक मंडळांच्यावतीने मानवी मनोरे रचत थरांवर थर लावण्याचा प्रयत्न केला होता. काहींना यात यश होते तर काही पथकांच्या माध्यमातून केवळ सलामी दिली जात होती. परंतु हंडी फोडताना रचले जाणारे हे थर कोसळल्यामुळे अनेक ठिकाणी गोविंदा जखमी झाल्याच्या घटना पहायला मिळत होत्या. (Dahi Handi 2026)

मुंबईतील विविध सरकारी व पालिका रुग्णालयांकडून रात्री ९वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दहीहंडी उत्सवादरम्यान एकूण १६८ गोविंदा जखमी झाले आहेत. यापैकी २९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ८१ जणांवर उपचार सुरू आहेत, तर ५८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. (Dahi Handi 2026)

विभागनिहाय जखमी गोविंदांची आकडेवारी:

शहर विभागातील रुग्णालये: जखमी – १०६, दाखल – १८, उपचार सुरू – ५२, डिस्चार्ज – ३६

पूर्व उपनगरातील रुग्णालये: जखमी – २९, दाखल – ०८, उपचार सुरू – ०६, डिस्चार्ज – १५

पश्चि उपनगरातील रुग्णालये: जखमी – ३३, दाखल-- ०५उपचार सुरू – २१, डिस्चार्ज – ७

सर्वाधिक जखमी गोविंदांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेली रुग्णालये:

केईएम रुग्णालय: जखमी – ३३ (सर्वाधिक), दाखल ०६,उपचार सुरू – १२, डिस्चार्ज – १५

नायर रुग्णालय: जखमी – १७, दाखल:०४, उपचार सुरू:१३, डिस्चार्ज ००

राजावाडी रुग्णालय: जखमी – २०, दाखल – ०५, उपचार सुरू – ०६, डिस्चार्ज – ०९

पोद्दार रुग्णालय: जखमी – १६, सर्व १६जण उपचार सुरु

हिंदुजा रुग्णालय: जखमी – १४, दाखल -०२, उपचार सुरू१२, डिस्चार्ज -००

सायन रुग्णालय: जखमी – ०८, दाखल -०४, उपचार सुरू ०४, डिस्चार्ज ००

कांदिवली डॉ आंबेडकर रुग्णालय: जखमी -१३, दाखल -२, उपचार सुरू-०४, डिस्चार्ज -०७

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >