केतनच्या पाठीवर 'सिया' नावाचं टॅटू अन् मोबाईलमधील 'ते' फोटो!
पुणे : लोणावळा येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रातून आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केतन सियाला एक खास बर्थडे गिफ्ट देणार होता. यासंदर्भात केतनच्या बहिणीने मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 5000 हून अधिक पानांचा चार्जशीट दाखल केला आहे.
केतनचं सियासाठी होतं खास बर्थडे गिफ्ट
केतनच्या पाठीवर त्याची होणारी पत्नी सिया हिच्या नावाचा टॅटू असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. केतनची बहीण संजना अग्रवाल हिने दिलेल्या जबाबानुसार, तिला केतनच्या मोबाईलमध्ये हा टॅटू असलेला फोटो आढळला होता. त्यानंतर तिने व्हिडिओ कॉलद्वारे सियाला हा फोटो दाखवल्याचे जबाबात नमूद आहे.
पुणे : केतन विशाल अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात त्याच्या लग्नाच्या तयारीबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपपत्रात केतनचे ...
लोहगड किल्ल्यावर केतनचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात संजनाच्या जबाबाचाही समावेश आहे. आरोपपत्रानुसार, केतनच्या मृत्यूनंतर संजनाने त्याचा मोबाईल तपासला. त्यावेळी तिला केतनच्या पाठीवर इंग्रजीमध्ये ‘सिया’ नावाचा टॅटू असलेला फोटो सापडला.
संजना हिच्या म्हणण्यानुसार, 19 जून 2026 रोजी सिया आपल्या आई-वडिलांसह आणि नातेवाईकांसोबत केतनच्या घरी आली होती. त्यावेळी हा फोटो तिला प्रत्यक्ष दाखवता आला नाही. त्यानंतर सिया घरी गेल्यावर संध्याकाळी सुमारे 7:30 वाजता तिचा संजनाला व्हॉट्सॲप मेसेज आला. सियाने केतनने तिच्यासाठी काय गिफ्ट आणले आहे, अशी विचारणा केली होती. यावर संजनाने नंतर फोन करण्याचे सांगितले.
केतनच्या मृत्यूनंतर मोबाईलमध्ये सापडला 'तो' फोटो
रात्री सुमारे 10 वाजता संजनाने सियाला व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल केला आणि केतनच्या मोबाईलमध्ये सापडलेला टॅटूचा फोटो तिला दाखवला, असा तिचा जबाब आहे.
केतनचा प्रोफाइल काढून घ्या....
याच आरोपपत्रात 20 जून रोजी झालेल्या कथित व्हॉट्सॲप संवादाचाही उल्लेख आहे. संजनाच्या म्हणण्यानुसार, सियाने केतनच्या प्रोफाइल पिक्चरमधून दोघांचा फोटो काढून दुसरा फोटो लावण्यास सांगितले होते. हा फोटो वृत्तमाध्यमांच्या हाती लागू नये, असा संदेश सियाने पाठवल्याचा दावा जबाबात करण्यात आला आहे.
केतन आणि सियाचे लग्न ठरले होते आणि दोघे नियमित संपर्कात होते, असेही संजनाने सांगितले आहे. 11 फेब्रुवारी 2026 रोजी नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नासाठी मंडप पाहण्याचा कार्यक्रम झाला होता, तर 19 फेब्रुवारीला पुण्यातील एका हॉटेलमध्ये साखरपुडा झाला. साखरपुड्यानंतर सियाने केतनच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट तयार केल्याचेही जबाबात नमूद करण्यात आले आहे.
लोहगडवरील 14 जूनच्या घटनेबाबतही संजनाच्या जबाबात माहिती देण्यात आली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी परतल्यानंतर केतनने सियाने ‘साप, साप’ असे ओरडत त्याला ढकलल्याचे सांगितले होते. केतनने स्वतःला वेळीच सावरल्यामुळे तो दरीत पडण्यापासून वाचल्याचा दावा करण्यात आला आहे.
केतनने ही बाब घरातील इतर सदस्यांना सांगू नये, असे संजनाला सांगितल्याचा उल्लेखही आरोपपत्रात आहे. सियाला लोहगडला जाणे आवडत होते आणि ती केतनला वारंवार तिथे घेऊन जाण्याचा आग्रह करत असल्याचे केतनने सांगितल्याचे संजनाने जबाबात म्हटले आहे. या सर्व दाव्यांची सत्यता आणि त्यामागील घटनाक्रमाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.






