Thursday, October 1, 2026

विरोधकांच्या नॅरेटिव्हला उत्तर देण्यासाठी भाजपची फौज मैदानात

विरोधकांच्या नॅरेटिव्हला उत्तर देण्यासाठी भाजपची फौज मैदानात

मंत्री नितेश राणे, आशिष शेलार, पडळकरांसह महत्त्वाच्या नेत्यांवर जबाबदारी

मुंबई : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांना अद्याप वेळ असला तरी राजकीय मुद्द्यांवर विरोधकांकडून सरकारला घेरण्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनेही आपली संघटनात्मक तयारी वाढवली आहे. विरोधकांकडून तयार करण्यात नॅरेटिव्हला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने राज्यातील प्रमुख नेत्यांची फळी मैदानात उतरवली असून, मंत्री नितेश राणे, (Nitesh Rane) आशिष शेलार (Ashish Shelar) तसेच आमदार प्रवीण दरेकर, (Pravin Darekar) संजय कुटे (sanjay Kute) आणि गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका होणार आहेत. त्याचवेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले जात असून, या मुद्द्यावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि खरीप पिकांचे नुकसान यावरूनही विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केले जात आहे. दुष्काळ निवारणासाठी सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना अपुऱ्या असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असल्याने या मुद्द्यावरही आगामी काळात राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या आरोपांना आणि त्यांच्या नॅरेटिव्हला उत्तर देण्यासाठी भाजपने नेत्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. मंत्री आशिष शेलार, मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर, संजय कुटे आणि गोपीचंद पडळकर हे प्रमुख नेते विविध मुद्द्यांवर भाजपची बाजू मांडणार आहेत. तर, महिला नेत्यांमध्ये आमदार चित्रा वाघ आणि देवयानी फरांदे यांच्यावरही विरोधकांना उत्तर देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. युवा नेत्यांमध्ये आमदार विक्रम पाचपुते, निरंजन डावखरे आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचाही या फळीत समावेश करण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >