ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! अखेर कल्याणमध्ये सुरू होणार 'अपर जिल्हाधिकारी कार्यालय', फेऱ्यांचा त्रास संपणार
ठाणे जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेता राज्य शासनाने एक मोठा व दिलासादायक निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाने अधिकृतपणे 'अपर जिल्हाधिकारी कार्यालय, कल्याण' स्थापन करण्यास मान्यता दिली असून, यामुळे चार तालुक्यांतील नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.
November 8, 2026 12:57 PM
अखेर कल्याणमध्ये सुरू होणार 'अपर जिल्हाधिकारी कार्यालय'
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
ठाणे: ठाणे जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार आणि जिल्हा मुख्यालयाचे असलेले लांब अंतर यामुळे कल्याण, उल्हासनगर, मुरबाड आणि अंबरनाथ या चार तालुक्यांतील नागरिकांना कागदपत्रे किंवा इतर लहान-सहान शासकीय कामांसाठी वारंवार ठाणे येथे फेऱ्या माराव्या लागत होत्या. नागरिकांची हीच मोठी अडचण दूर करण्यासाठी राज्य शासनाने अखेर कल्याणमध्ये नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
अंधेरी पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील बहार जंक्शनजवळ शुक्रवारी सकाळी मोटारसायकल आणि कारच्या अपघाताची घटना घडली. या अपघातात बीकेसी येथे ...
नवीन प्रशासकीय रचना कशी असेल?
या नवीन रचनेनुसार कल्याण, उल्हासनगर, मुरबाड आणि अंबरनाथ हे चार तालुके आता थेट कल्याणच्या नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेत येतील. दुसरीकडे, ठाणे, भिवंडी आणि शहापूर हे तीन तालुके पूर्वीप्रमाणे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत कार्यरत राहतील.
त्वरित अंमलबजावणीचे आदेश
कल्याण येथील या नवीन कार्यालयासाठी शासन स्तरावरून 'अपर जिल्हाधिकारी' आणि 'तहसीलदार' ही पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे, या कार्यालयाचे कामकाज लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी प्रशासनाला तातडीने तात्पुरती जागा निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या संपूर्ण प्रक्रियेचा अहवाल पुढील १५ दिवसांच्या आत शासनाला सादर करण्यास सांगण्यात आले आहे, ज्यामुळे या कार्यालing चे कामकाज लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रामध्ये (MMR) रेल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या आहेत. पनवेल ते वसई दरम्यानच्या प्रस्तावित ...
या निर्णयामुळे कल्याण परिसरातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय कामे अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पार पडण्यास मदत होईल.