Saturday, November 7, 2026

Special Waste Management: विशेष काळजी योग्य कचरा विल्हेवाटीसाठी मुंबईत ७ ठिकाणी ११ युनिट्स तब्बल तीन युनिट्स स्थानिकांच्या विरोधामुळे पडले बंद प्रति प्रक्रिया केंद्र ४ टन क्षमतेचा

मुंबईतील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ७ ठिकाणी ११ विशेष प्रक्रिया युनिट्स उभारण्यात आली आहेत. मात्र, स्थानिकांच्या विरोधामुळे तीन युनिट्स बंद पडली असून, प्रत्येक प्रक्रिया केंद्राची क्षमता प्रतिदिन ४ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन नियम अंतर्गत ओला कचरा, सुका कचरा, स्वच्छताविषयक कचरा आणि विशेष काळजीयोग्य कचरा असे चार प्रकारात वर्गीकरण करून त्या प्रकारे वर्गीकरण केलेल्या कच याची प्रक्रिया व विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. त्यानुसार मुंबईत ४ टन प्रति दिवस क्षमतेच्या, प्लाझ्मा तंत्रज्ञानावर आधारित ११ ठिकाणी स्वच्छता विषयक कचरा आणि विशेष काळजीयोग्य कचरा विल्हेवाट युनिट्सची निर्मिती करण्यात आली आहे. या परंतु या ११ प्रक्रिया केंद्रांपैंकी ओशिवरामधील एक आणि कांजूर मार्ग येथील दोन प्रक्रिया केंद्रे ही स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे बंद पडलेली आहे. प्रक्रिया केंद्र सुरु केल्याच्या पहिल्याच वर्षांत दोन ठिकाणचे तीन प्रक्रिया केंद्र बंद पडल्यानंतर अद्यापही त्याच ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी सुरु करण्याबाबतची कार्यवाही झालेली नाही.

मुंबईत दररोज निर्माण होणारा सुमारे ७२०० मेट्रीक टन कचरा निर्माण होत असतो. मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध योजना राबवलया जात असतात.त्यानुसार, घनकचरा व्यवस्थापन नियम अंतर्गत ओला कचरा, सुका कचरा, स्वच्छताविषयक कचरा आणि विशेष काळजीयोग्य कचरा असे चार प्रकारात वर्गीकरण करणे व अशा प्रकारे वर्गीकरण केलेल्या कच याची प्रक्रिया व विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. स्वच्छताविषयक कचरा आणि विशेष काळजीयोग्य कच-याच्या घटकांची विल्हेवाट इतर कचऱ्याबरोबर न करता वेगळ्यारित्या करणे आवश्यक आहे.(Special Waste Management)

त्यामुळे, मुंबई महानगरपालिकेने प्लाझ्मा तंत्रज्ञानावर आधारीत ४ टन प्रति दिवस क्षमतेचे अकरा स्वच्छताविषयक कचरा आणि विशेष काळजीयोग्य कचरा प्रक्रिया संयंत्रांची सात ठिकाणी ११ प्रक्रिया युनिट्स उभारणी करुन कार्यान्वित करण्यात आले आहेत. या प्रक्रिया केंद्रांची उभारणी झाल्यांनतर याची देखभाल करण्यासाठीचा हमी कालावधी १८ ऑगस्ट २०२६मध्ये पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता या प्रक्रिया केंद्रांचे पुढील एक वर्षांच्या कालावधीसाठी देखभाल करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे. एचईसी एन्व्हाइरो (इंडिया) प्रा. लि. यांची निवड करण्यात आली असून यासर्व प्रक्रिया केंद्रांच्या देखभालीसाठी पुढील वर्षभरात विविध करांसह ५.१४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.(Mumbai Waste Disposal)

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई महानगरपालिकेने घरांमधून निर्माण होणा-या स्वच्छताविषयक कचरा आणि विशेष काळजीयोग्य कचरा विकेंद्रित पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी सात (०७) ठिकाणी प्रत्येकी ४ टन प्रति दिवसक्षमतेचे अकरा (११) 'प्लाइमा तंत्रज्ञानावर आधारित मॉड्यूलर कचरा प्रक्रिया युनिट्स' उभारले आहेत. याच्या देखभालीचे कंत्राट संपुष्टात आल्याने नवीन कंत्राटदाराची देखभालीसाठी निवड करण्यासाठी निविदा मागवली होती, त्यात जी कंपनी लघुत्तम ठरली आहे, त्या कंपनीची निवड केल्यानंतर याला मान्यता देण्यासाठी स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला आहे.

विशेष कचरा म्हणजे काय?

मुंबईत विशेष कचऱ्यांतर्गत ७० ते ८० टन कचरा हा वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित असतो. त्यामध्ये प्रामुख्याने वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, टॅम्पॉन्स, निरोध आणि इतर स्वच्छतासंबंधित बाबींचा तसेच शरीर पुसण्यासाठी वापरलेले विविध द्रवांनी दूषित कापूस, बँडेजेस जसे की लघवी, रक्त, लाळ, पू, विष्ठा, नखांनी दूषित झालेले असे, इंजेक्शन, सुई, रेझर ब्लेड्स अशी कालबाह्य औषधे आणि श्रृंगार केंद्रामध्ये (ब्यूटी पार्लर) निर्माण होणारा कचरा जसे की वॅक्सिंग स्ट्रिप्स, पीपीई आदींचा समावेश असतो. हा अत्यंत घातक प्रकारचा कचरा असला तरी बरेचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि सामान्य घरगुती कचऱ्यामध्येच ते टाकले जाते. त्यामुळे, कचरा संकलित करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी क्लिष्टता निर्माण होते.(Waste Processing Unit)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >