Thursday, November 19, 2026

Gemini 4 Neon Launch : गुगलचे नवे AI मॉडेल, किंमत आणि वैशिष्ट्ये

गुगलने Gemini 4 कुटुंबातील चौथे मॉडेल Neon लाँच केले आहे. कोडिंग, ज्ञानाधारित कामे आणि विज्ञानासाठी फ्रंटियर-स्तरीय बुद्धिमत्ता, कमी किंमतीत उपलब्ध.

अलीकडे गूगलने आतापर्यंतचे काही सर्वात शक्तिशाली एआय मॉडेल्स सादर केले आहेत, आणि जेमिनी 4 आर्गॉन, जेमिनी 4 कार्बन आणि आता जेमिनी 4 हायड्रोजनच्या आगमनानंतर लगेचच, जेमिनी ४ निऑनच्या प्रकाशनासह गूगलचा विस्तार सुरूच आहे. Gemini 4 Neon १८ नोव्हेंबर २०२६ रोजी लाँच करण्यात आला आहे. रोजच्या साध्या गप्पा आणि मोठ्या रिसर्चमधली दरी भरून काढण्यासाठी हा मॉडेल तयार करण्यात आला आहे.या नावांमध्ये गोंधळ होणं स्वाभाविक आहे. Gemini 4 Hydrogen १२ नोव्हेंबरला लाँच झाला. रोजच्या जलद कामांसाठी आणि कमी खर्चाच्या कामांसाठी याचा वापर होतो. Gemini 4 Neon नवा मिडल वर्कहॉर्स. मल्टी-स्टेप कोडिंग, स्प्रेडशीट अॅनालिसिस आणि वैज्ञानिक रिसर्चसाठी बनवलेला आहे. Gemini 4 Carbon  १० नोव्हेंबरला मोठ्या, दीर्घकाळ चालणाऱ्या इंजिनिअरिंग प्रोजेक्टसाठी हा फ्लॅगशिप मॉडेल लाँच झाला.

Neon हा थेट Carbon पासून बनवलेला आहे. त्यामुळे त्याला १० लाख टोकनचा कॉन्टेक्स्ट विंडो मिळतो. एकाच प्रॉम्प्टमध्ये टेक्स्ट, कोड, ऑडिओ, व्हिडिओ, PDF आणि मोठ्या स्प्रेडशीट टाकता येतात. डेव्हलपर्सना त्याची विचार करण्याची क्षमता चार पातळ्यांवर सेट करता येते. Argon सप्टेंबरच्या अखेरीस लाँच झाला होता. फक्त सात आठवड्यात त्याला काढणं अनेकांना धक्कादायक वाटलं. गुगलने याबाबत अधिकृत खुलासा केलेला नाही. पण बेंचमार्क पाहिले तर चित्र स्पष्ट होतं. कोडिंग, टूलचा वापर आणि सूचनांचं पालन यात Neon हा Argon पेक्षा पुढे आहे. त्यामुळे चार सारखे मॉडेल ठेवण्यात अर्थ नव्हता.

Neon किती वेगवान ?

xhigh सेटिंगवर Neon ने ६१ गुण मिळवले आहेत. तो जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या पुढे फक्त Claude Fable 5.2 आणि OpenAI चा GPT-6.2 Astra आहेत. कोडिंगमध्ये तर Neon ने ५८.६ गुणांसह पहिला क्रमांक पटकावला आहे. गुगलच्या दाव्यानुसार Neon हा Carbon पेक्षा तीन पट वेगवान आहे आणि ६०% खर्चात काम करतो. मात्र प्रत्यक्ष टेस्टमध्ये तो Carbon पेक्षा जवळपास दुप्पट वेगवान असून खर्चात ३२% बचत करतो. एक कमकुवत बाजूही आहे. चुकीची माहिती देण्याचं प्रमाण Neon मध्ये १३.९% आहे, जे Carbon (११.४%) आणि Argon (४.३%) पेक्षा जास्त आहे.

किंमत आणि कॅच काय?

Neon ची किंमत १० लाख इनपुट टोकनसाठी ३ डॉलर आणि आउटपुटसाठी १५ डॉलर आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. Carbon सध्या प्रमोशनल ऑफरमध्ये २ डॉलर / १० डॉलर दराने मिळत आहे. ही ऑफर ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस Neon हा Carbon पेक्षा महाग पडेल. १ डिसेंबरनंतर Carbon ची किंमत ४ डॉलर / २० डॉलर होईल, तेव्हा Neon स्वस्त ठरेल. Google AI Pro किंवा Ultra युजर्सना Gemini अॅपमध्ये 'Deeper analysis' मध्ये Neon मिळेल. फ्री युजर्सना अजून याचा अॅक्सेस नाही. डेव्हलपर्स AI Studio मधून API द्वारे वापरू शकतात.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >