भारतीयांचे सरासरी आयुर्मान दोन वर्षांनी घटले!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाने जगभरात थैमान घातले. भारतातही दोन लाटेत अनेकांचे मृत्यू झाले. तर, अनेक जण सुदैवाने बचावले. कोरोना महामारीला दोन वर्षे होत असून त्याचे दूरगामी परिणामही आता दिसू लागले आहेत. कोरोना काळात अर्थात गेल्या साधारणपणे दोन वर्षांमध्ये देशातील नागरिकांचं सरासरी आयुर्मान दोन वर्षांनी घटले आहे. मंबईतल्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन स्टडीजने (आयआयपीएस) हा अभ्यास केला असून त्यांनी नुकताच आपला अहवाल जाहीर केला आहे.


कोेरोनाच्या साथीचे देशभरातील मृत्यूदरावर कशा प्रकारे परिणाम झाले, याचा अंदाज घेण्यासाठी आयआयपीएसकडून हा अभ्यास करण्यात आला होता. या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे त्याचा देशाच्या सरासरी आयुर्मानावर काय परिणाम झाला, याचा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला. यासाठी ग्लोबल बर्डन डिसीज स्टडी आणि कोविड इंडिया अॅप्लिकेशन प्रोग्रामच्या पोर्टलवरून माहितीचा वापर करण्यात आल्याचे आयआयपीएसकडून स्पष्ट करण्यात आले.


या अभ्यासातील निष्कर्षांनुसार, कोरोना काळात देशातील सरासरी आयुर्मान दोन वर्षांनी कमी झाल्याचे दिसले. त्यामुळे आता भारतातील सरासरी आयुर्मान हे २०१९मध्ये होते, तितके झाल्याचा दावा देखील संस्थेकडून करण्यात आला आहे. कोरोनाच्या आधी भारतातील सरासरी आयुर्मान पुरुषांसाठी ६९.५ वर्ष इतके होते. तेच आता ६७.५ वर्षं अर्थात दोन वर्षांनी घटल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. त्यासोबतच, महिलांसाठी जे आयुर्मान ७२ वर्ष होते, ते आता ६९.८ वर्ष अर्थात २ वर्षं चार महिन्यांनी घटले आहे. आयआयपीएसचे असिस्टंट प्रोफेसर सूर्यकांत यादव यांचा हा स्टडी बीएमसी पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये छापून आला आहे.



मृतांमध्ये पुरुष अधिक


या अभ्यासातून हे देखील समोर आले आहे की, कोरोना काळात मृत्यूमुखी पडलेल्या पुरुषांमध्ये प्रामुख्याने ३५ ते ६९ वयोगटातील पुरुषांचा समावेश आहे. सरासरी आयुर्मान घटण्यामध्ये या वयोगटात झालेले मृत्यू प्रामुख्याने कारणीभूत ठरल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

BRICS Summit 2026 : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात; पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठकीत 'या' क्षेत्रांवर भर

दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर दाखल झाले असून, ब्रिक्स शिखर

E commerce rules : ई-कॉमर्स क्षेत्रासाठी केंद्र सरकारचे नवे नियम जाहीर; ग्राहक संरक्षण मजबूत होणार, सुधारित नियम..... पासून लागू

नवी दिल्ली : ई-कॉमर्स क्षेत्रातील ग्राहक संरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी आणि डिजिटल बाजारपेठेत पारदर्शकता

Social Media : १८ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर निर्बंध? सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली : १८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत सुरक्षेचे कठोर उपाय करण्याची मागणी करणारी याचिका

BRICS Summit 2026 : ब्रिक्स शिखर परिषद २०२६ नवी दिल्लीत सुरू; विविध राष्ट्रीय हितसंबंधांत सहमती घडवून आणण्याचे जगासमोर मोठे आव्हान

नवी दिल्ली : युद्ध, आर्थिक निर्बंध, व्यापारातील वाढते अडथळे आणि पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर

दुबई, अमेरिका की भारत... iphone 18 pro ची सीरीज सर्वाधिक महाग कोणत्या देशात?

मुंबई: ॲपलकडून नव्या iphone 18 pro ची सीरीज लाँच करण्यात आली. काल आयफोन लाँच झाल्यापासून सोशल मीडियावर त्याची जोरदार

Isro ce20 Cryogenic Engine : इस्रोची ऐतिहासिक भरारी : 'CE20' क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी; 'गगनयान' मोहिमेची ताकद वाढणार!

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) देशाच्या अंतराळ क्षेत्रातील प्रगतीत आणखी एक सुवर्णपान जोडले आहे.