आर्यन खानची काळजी करणाऱ्या ताईंना लव्ह जिहाद पीडित भगिनींचे दु:ख दिसत नाही का?

नितेश राणे यांनी लगावला खोचक टोला!


पुणे: आर्यन खानची काळजी करणाऱ्या ताईंना लव्ह जिहादचा सामना करावा लागलेल्या आमच्या भगिनींचे दु:ख दिसत नाही का? त्यांनाही कधीतरी भेटायला या, असा सुप्रिया सुळे यांना खोचक टोला लगावत भाजप आमदार नितेश राणे यांनी लव्ह जिहाद प्रकरणी गप्प असलेल्या महाविकास आघाडीचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी असे गुन्हे करणाऱ्यांना आता गृहमंत्री महाविकास आघाडीचा राहिला नसून शिवसेना-भाजप सरकारचा आहे. तसेच हिंदूंचे अथवा हिंदू भगिनींचे जबरदस्तीने धर्मांतर कराऱ्याला दोन पायांवर परत जाऊ देणार नाही असा सज्जड दम भरला. यावेळी लव्ह जिहाद पिडित एका तरुणीने तिच्यासोबत घडलेली घटना माध्यमांसमोर सांगतली.


नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील मुंढवा भागात लव्ह जिहादची घटना घडल्याप्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मुंढवा येथील धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौक ते जय हिंद चौक घोरपडी दरम्यान मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘हिंदू मुलींचा जीव घेणार्‍या नराधम जिहादीला फाशी झाली पाहिजे’ ही मागणी मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी केली. पुण्यातील पीडीत तरुणीचा जो गुन्हेगार आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नितेश राणे यांनी यावेळी केली.


‘राज्यात हिंदू मुलींचे धर्मांतर होत नाही. अन्याय - अत्याचार होत नाही. तिहेरी तलाक राहिला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका राज्यातील काही नेते मंडळी घेत आहेत’, अशा शब्दात नितेश राणे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला. तसेच या लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपींना वाचविण्याचे काम काही पोलीस अधिकारी करित आहेत. त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे ते म्हणाले.

Comments
Add Comment

Nitesh Rane: यवतमाळातील दुष्काळी परिस्थितीची नितेश राणे यांनी केली पाहणी, मच्छीमार बांधवांना मदतीची दिली ग्वाही

यवतमाळ: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज मत्स्यव्यवसाय आणि बंदरे

पुणे शिक्षक मतदारसंघाचा तिढा कायम! पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री शिंदे भेटीत काय घडलं?

मुंबई: विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील तिढा अद्याप कायम असल्याचे

Maharashtra Drought: दुष्काळी कामांसाठी आमदार निधीतून करणार मदत, टंचाई निवारणासाठी सरकारचा निर्णय

मुंबई: राज्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टंचाईग्रस्त भागांमध्ये तातडीच्या उपाययोजना

BJP News: भाजप युवा मोर्चाची नवी टीम जाहीर, 29 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई: युवा संघटन अधिक बळकट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सोमवारी युवा मोर्चाची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर

Nitesh Rane: दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांचा विदर्भ दौरा

वाशिम: महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत जलाशय आणि तलावातील पाणीसाठा कमी असल्यामुळे

विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय; ताजा, सकस आहार वेळेत मिळण्यासाठी केल्या उपाययोजना

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण विभागाला आणि महिला- बालविकास विभागाला, 'प्रधानमंत्री पोषण