Shanta Tambe : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन

कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे आज (सोमवारी) निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. शांता तांबे यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


तब्बल सात दशके त्यांनी अभिनय क्षेत्र गाजवले. त्यानंतर उतरत्या वयामुळे त्या अभिनय क्षेत्रापासून काहीशा दूर झाल्या. त्या कोल्हापूरातील त्यांच्या घरी राहत होत्या. त्या अलीकडेच 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत दिसल्या. या मालिकेत त्यांनी छोटी भूमिका साकारली होती. शांता तांबे यांनी नाटकामध्ये काम करून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.


आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी भालजी पेंढारकर, दिनकर पाटील, अनंत माने आदी ख्यातनाम दिग्दर्शकांसोबत काम केले. मोहित्यांची मंजुळा, सवाल माझा ऐका, मोलकरीण, बाई मोठी भाग्याची, मर्दानी, दोन बायका फजिती ऐका, चांडाळ चौकडी, असला नवरा नको गं बाई, सोंगाड्या, चंदनाची चोळी अशा अनेक चित्रपटांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीस आल्या.


घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने चित्रपटांमध्ये काम करण्याचे ठरवले होते, असे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते.

Comments
Add Comment

Nitesh Rane: यवतमाळातील दुष्काळी परिस्थितीची नितेश राणे यांनी केली पाहणी, मच्छीमार बांधवांना मदतीची दिली ग्वाही

यवतमाळ: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज मत्स्यव्यवसाय आणि बंदरे

पुणे शिक्षक मतदारसंघाचा तिढा कायम! पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री शिंदे भेटीत काय घडलं?

मुंबई: विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील तिढा अद्याप कायम असल्याचे

Maharashtra Drought: दुष्काळी कामांसाठी आमदार निधीतून करणार मदत, टंचाई निवारणासाठी सरकारचा निर्णय

मुंबई: राज्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टंचाईग्रस्त भागांमध्ये तातडीच्या उपाययोजना

BJP News: भाजप युवा मोर्चाची नवी टीम जाहीर, 29 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई: युवा संघटन अधिक बळकट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सोमवारी युवा मोर्चाची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर

Nitesh Rane: दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांचा विदर्भ दौरा

वाशिम: महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत जलाशय आणि तलावातील पाणीसाठा कमी असल्यामुळे

विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय; ताजा, सकस आहार वेळेत मिळण्यासाठी केल्या उपाययोजना

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण विभागाला आणि महिला- बालविकास विभागाला, 'प्रधानमंत्री पोषण