बारामतीत हुंड्यासाठी विवाहितेला शेततळ्यात बुडवून मारले

बारामती : भारतात हुंडा घेणे आणि देणे दोन्हीही कायद्याने गुन्हा आहे. असे असले तरी भारताच्या अनेक भागामध्ये हुंडा परंपरा आजही सुरु आहे. यामुळे अनेक तरुणींनी आपले आयुष्य गमावले आहे. कायद्याने जरी यासाठी कठोर नियम असले तरीही यावर पूर्णपणे आळा घालण्यात आलेला नाही. आता तर महिला खासदार सुप्रिया सुळे यांच्याच मतदार संघातील बारामती तालुक्यात एका विवाहितेला हुंड्यासाठी दोन्ही हात बांधून शेततळ्यात बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेवरुन सगळीकडे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील चौघाविरुद्ध पोलिसांनी खुनाचा व हुंडा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पती, सासू, नणंद व नंणदेचा पती या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील गिरिम येथील नामदेव बबन करगळ यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. यात सुरेखा भाऊसाहेब गडदरे असे या दुर्दैवी मयत महिलेचे नाव आहे. लग्नात अपेक्षेप्रमाणे हुंडा मिळाला नसल्याने सासरचे लोक सुरेखाचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांनी याप्रकरणी पती भाऊसाहेब महादेव गडदरे, सासु ठकुबाई महादेव गडदरे नणंद आशा कोकरे व तिचा पती सोनबा कोकरे या चौघां विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.


२४ डिसेंबर रोजी मासाळवाडीच्या भगवान गडदरे यांच्या शेतातील शेततळ्यात त्यांची विवाहित मुलगी सुरेखा हिचा मृतदेह आढळून आला. वरील चौघा आरोपींनी तिच्या घराशेजारी असलेल्या शेततळ्यामध्ये सुरेखा हिचे दोन्ही हात बांधून तिला शेततळ्यात बुडवून मारले अशी फिर्याद तिचे वडील करगळ यांनी पोलिसांकडे दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.


दरम्यान, इतक्या क्रूरपणे हुंड्यासाठी सुनेला मारणाऱ्या निर्दयी आरोपींना कडक शिक्षा करावी, अशी मृत मुलीच्या कुटुंबाने मागणी केली आहे.

Comments
Add Comment

Indian Railways : दसरा-दिवाळीत घरवापसी सोपी! पुणे आणि हडपसरहून विदर्भ अन् उत्तर भारतासाठी विशेष रेल्वे गाड्या जाहीर

पुणे : आगामी दसरा, दिवाळी आणि छठपूजा या सणांच्या काळात प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रेल्वे

MPSC Exam Postpond: मोठी बातमी! राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली, नवी तारीख काय?

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 2026 च्या राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि इतर परिक्षा

Pune News: पुणे आर्थिक प्रदेशासाठी मास्टरप्लॅन, 2036 पर्यंत शहर कसं दिसणार? मुख्यमंत्र्यांनी दाखवला रोडमॅप

पुणे: नीती आयोगाच्या ‘ग्रोथ हब’उपक्रमांतर्गत पुणे आर्थिक क्षेत्राचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्यात आला. या

FDA Action: महाराष्ट्रातील 30 हॉटेल- आस्थापनांचे परवाने निलंबित, 50 हजार किलोचा अन्नसाठा जप्त

मुंबई: अन्न- औषध प्रशासनाने गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रातील 30 ठिकाणच्या हॉटेल आणि आस्थापनांचे परवाने निलंबित

महाराष्ट्राच्या आर्थिक व्यवस्थेला गती देणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'ॲक्शन प्लॅन'!

मुंबई: राज्याच्या आर्थिक व्यवस्थेत आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी सहा महिन्यांत सुधारणा आणि कृतीचा आराखडा तयार

Single Mother Education Policy : एकल माता कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरणाचा मार्ग मोकळा

- ‘शैक्षणिक सहाय्य, संरक्षण आणि सक्षमीकरण धोरण-२०२६’साठी समितीचा अहवाल सादर मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील