FDA Action: महाराष्ट्रातील 30 हॉटेल- आस्थापनांचे परवाने निलंबित, 50 हजार किलोचा अन्नसाठा जप्त

मुंबई: अन्न- औषध प्रशासनाने गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रातील 30 ठिकाणच्या हॉटेल आणि आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. शिवाय, 26 आस्थापनांची तपासणी करत लाखो रूपयांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमध्ये एफडीएकडून 22 जणांवर गुन्हा दाखल करत 30 जणांना अटक केली आहे. एफडीएच्या ह्या धडक कारवाईमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील दुकानदारांचे आणि हॉटेल चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर एफडीएने केलेल्या कारवाईमध्ये हजारो किलोंचा साठा जप्त करत करोडो रूपयांचा मुद्दे माल जप्त केला आहे.



23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान सणासुदीच्या निमित्ताने अन्न- औषध प्रशासनाने धडक कारवाईमध्ये विविध जिल्ह्यांत मिठाई, दूध- दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, तांदूळ, ड्रायफ्रूट्स, नमकीन, फरसाण, चहा, मसाले, सॉस, नूडल्स, वेफर्स आणि इतर अन्नपदार्थांचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला आहे. हा एकूण जप्त केलेला साठा 50,601.78 किलोंचा असून याची किंमत तब्बल 1 कोटी 19 लाख इतकी आहे. मुंबई 13, कोकण विभाग 6, पुणे 8 आणि छत्रपती संभाजीनगर 3 अशा महाराष्ट्रातील 30 ठिकाणच्या हॉटेल- रेस्टॉरंट्सचे एफडीएकडून अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहे.



यामध्ये मुंबईतील काळबादेवी, धारावी, कुलाबा, परळ, लोअर परळ, फोर्ट, बांद्रा पश्चिम, सांताक्रुझ पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम, खार पश्चिम, विलेपार्ले आणि चेंबूर या परिसरातील हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये धडक कारवाई केलेली आहे. तर, कोकण विभागामध्ये ठाणे आणि नवी मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये स्वच्छता आणि आरोग्य विषयक निकषांचे पालन न केल्यामुळे एफडीएकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही धडक कारवाई करत जिल्ह्यातील दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून एफडीएकडून स्वच्छतेसंबंधित कारवाई सुरू असतानाही अनेक ठिकाणी नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळण्याचा प्रकार सुरू होता.



या प्रकरणी नवी मुंबई आणि रायगड परिसरातील अनेक हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि आस्थापनांमधील वस्तूंचे नमुने प्रयोगशाळेमध्ये विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. कमी दर्जाचे पदार्थ, मिसब्रँडिंगचे पदार्थ आणि प्रोडक्टवर लेबल नसल्यामुळे यासह अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे वस्तुंचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत. मुंबई, ठाणे आणि पुणेसह संपूर्ण राज्यातील आस्थापनांवर आणि हॉटेल- रेस्टॉरंटवर एफडीएकडून कारवाई करण्यात आली आहे. एफडीएकडून कारवाई केलेल्या पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले असून रिपोर्ट आल्यानंतर अनेक दुकानदारांवर पुढची कारवाई करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या आर्थिक व्यवस्थेला गती देणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'ॲक्शन प्लॅन'!

मुंबई: राज्याच्या आर्थिक व्यवस्थेत आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी सहा महिन्यांत सुधारणा आणि कृतीचा आराखडा तयार

Single Mother Education Policy : एकल माता कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरणाचा मार्ग मोकळा

- ‘शैक्षणिक सहाय्य, संरक्षण आणि सक्षमीकरण धोरण-२०२६’साठी समितीचा अहवाल सादर मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील

Nitesh Rane : अपुऱ्या पावसामुळे सोमठाणा तलावातील मत्स्यउत्पादनात मोठी घट; मंत्री नितेश राणे यांनी दिले पंचनाम्याचे आदेश

जालना (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा तलावाची मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश

MSRTC : ‘लालपरी’ आता होणार ‘ई-लालपरी’; 2037 पर्यंत 100% इलेक्ट्रिक बसेसचे लक्ष्य

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता मोठा बदल होणार आहे. सन 2037 पर्यंत

Nitesh Rane : बदनापूर तालुक्यातील राजेवाडी तलावाला मंत्री नितेश राणे यांची भेट

गाळ काढण्यासह संवर्धन तलावाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश जालना : कमी पावसामुळे जालना जिल्ह्यातील

Beed Bottle Mic Reporting : ‘आम्हाला अधिकारी व्हायचंय, फक्त शिक्षक द्या...’; बॉटल माईक घेऊन चिमुकल्यांनी मांडली समस्या, प्रशासनानेही घेतली दखल

बीड : “आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या...” अशी भावनिक हाक देत बीडच्या हिवरापहाडी येथील