मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 2026 च्या राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि इतर परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2025 मध्ये झालेल्या राज्यसेवा मुख्य परिक्षेच्या उत्तरपत्रिकांचे पुन:र्मुल्यांकन करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काही तासांपूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्धीपत्रक काढून हा महत्त्वाचा निर्णय जारी करण्यात आलेला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यामध्ये झालेल्या पेपरफुटीच्या प्रकरणामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
सरकारी कार्यालयांत सौजन्याची वागणूक, महिन्यातील पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी दोन तास राखीव मुंबई : आमदार आणि खासदारांनी शासकीय कामांबाबत ...
अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून 2025 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परिक्षेच्या मुल्यांकनाबद्दल आक्षेप नोंदवण्यात आला होता. हाच आक्षेप लक्षात घेत, राज्य सेवा मु्ख्य परिक्षा- 2025 च्या उत्तर पत्रिकांचे पुन:र्मुल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 2026 मध्ये होणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि इतर परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे.
वारंवार पेपरफुटीचे प्रकरण होत असल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणण्याची मागणी अनेक विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे. इतकंच नाही तर, विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडूनही आयोगाच्या अध्यक्षांनी या कथित घोटाळ्यांची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही केली जात आहे.
पुणे: नीती आयोगाच्या ‘ग्रोथ हब’उपक्रमांतर्गत पुणे आर्थिक क्षेत्राचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्री ...
दरम्यान, 3 ऑक्टोबर 2026 पासून आयोजित करण्यात आलेल्या मुख्य परिक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयोगाने घेतला. विद्यार्थी, पालक आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागण्यांचा विचार करून आयोगाने ‘राज्य सेवा मुख्य परीक्षा-2026’, ‘महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा-2026’ आणि ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा-2026’ या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून अद्याप आयोगाकडून परीक्षेची नवीन तारीख जाहीर केलेली नाही. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच स्वतंत्रपणे जाहीर करू असं आयोगाने प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे.