नाशिकला १२ जानेवारीपासून राष्ट्रीय युवा महोत्सव; पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून महोत्सवाच्या तयारीचा आढावा


महोत्सवासाठी महाराष्ट्राची निवड; यशस्वी आयोजन करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुंबई : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.


सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता आदी उपस्थित होते. नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.


युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी राज्य शासनाला मिळाली आहे. त्यामुळे नाशिक येथे दिनांक १२ ते १६ जानेवारी या कालावधीत २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव २०२४ होणार आहे. त्यामध्ये देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांच्यातील युवांचे चमू सहभागी होणार आहेत. त्यामुळे महोत्सवाचे आयोजन यशस्वी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


या महोत्सवात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश यातील प्रत्येकी १०० युवांचा चमू, राष्ट्रीय सेवा योजना युवा स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटन युवा स्वयंसेवक असे सुमारे ८ हजार जण यात सहभागी होणार आहेत. १२ जानेवारीला या महोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नाशिक येथील तपोवन मैदानावर उद्घाटन समारंभ होणार आहे. महोत्सवांतर्गत सांस्कृतिक, कौशल्य विकास, युवा कृती असे स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये समूह लोकनृत्य, लोकगीत, कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व, छायाचित्र, हस्तकला, वस्त्रोद्योग, कृषी उत्पादने यांचा समावेश असणार आहे.


महोत्सवाच्या आयोजनासाठी विविध समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती गठित करण्यात आली आहे. त्याचबरोबर गृह, वित्त, महसुल, कृषी, उच्च व तंत्रशिक्षण, सांस्कृतिक कार्य, पर्यटन, शालेय शिक्षण या विविध विभागांचा सहभाग असून त्यांनी समन्वयातून या महोत्सवाचे आयोजन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.


आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निवास, भोजन व्यवस्था, कार्यक्रमस्थळ याबाबत आढावा घेतला. त्याचबरोबर महोत्सवासाठी करण्यात आलेले बोधचिन्ह, घोषवाक्य याबाबत क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी सादरीकरण केले.

Comments
Add Comment

Indian Railways : दसरा-दिवाळीत घरवापसी सोपी! पुणे आणि हडपसरहून विदर्भ अन् उत्तर भारतासाठी विशेष रेल्वे गाड्या जाहीर

पुणे : आगामी दसरा, दिवाळी आणि छठपूजा या सणांच्या काळात प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रेल्वे

MPSC Exam Postpond: मोठी बातमी! राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली, नवी तारीख काय?

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 2026 च्या राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि इतर परिक्षा

Pune News: पुणे आर्थिक प्रदेशासाठी मास्टरप्लॅन, 2036 पर्यंत शहर कसं दिसणार? मुख्यमंत्र्यांनी दाखवला रोडमॅप

पुणे: नीती आयोगाच्या ‘ग्रोथ हब’उपक्रमांतर्गत पुणे आर्थिक क्षेत्राचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्यात आला. या

FDA Action: महाराष्ट्रातील 30 हॉटेल- आस्थापनांचे परवाने निलंबित, 50 हजार किलोचा अन्नसाठा जप्त

मुंबई: अन्न- औषध प्रशासनाने गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रातील 30 ठिकाणच्या हॉटेल आणि आस्थापनांचे परवाने निलंबित

महाराष्ट्राच्या आर्थिक व्यवस्थेला गती देणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'ॲक्शन प्लॅन'!

मुंबई: राज्याच्या आर्थिक व्यवस्थेत आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी सहा महिन्यांत सुधारणा आणि कृतीचा आराखडा तयार

Single Mother Education Policy : एकल माता कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरणाचा मार्ग मोकळा

- ‘शैक्षणिक सहाय्य, संरक्षण आणि सक्षमीकरण धोरण-२०२६’साठी समितीचा अहवाल सादर मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील