Pune Hit And Run : पोर्शे कार प्रकरणातील धनिकपुत्राला महाविद्यालयात अ‍ॅडमिशन मिळेना!

पुणे : विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुणे (Pune) शहरातील कल्याणीनगर परिसरात काही महिन्यांपूर्वी भीषण अपघात (Porsche Car Accident) घडला होता. पुण्यासह राज्यभरात खळबळ उडालेल्या या पोर्शे कार अपघात प्रकरणी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. हिट अँड रन प्रकरणातील पोर्शेचालक अल्पवयीन आरोपी मुलाला शिक्षणासाठी प्रवेश मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. मुलाने केलेल्या कारनाम्यांमुळे दिल्लीमधील एका शैक्षणिक संस्थेने कॉलेजमध्ये प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे या मुलाला शिक्षणात अनेक बाधा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा बारावी उत्तीर्ण आहे. त्याने दिल्लीमधील एका शैक्षणिक संस्थेत बीबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज केला होता, त्याला याठिकाणी प्रवेशही मिळाला. मात्र, अपघात प्रकरणात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळताच संस्थेने त्याला अॅडमिशन देण्यास नाकारले. या प्रकारानंतर मुलाच्या वकिलांनी याबाबतची तक्रार बाल न्यायमंडळाकडे दिली आहे. मुलाच्या शिक्षणात कोणतीही बाधा येऊ नये, अशी भूमिका अल्पवयीन आरोपी मुलाच्या वकिलांनी घेतली आहे.


दरम्यान, या अल्पवयीन आरोपी मुलाला प्रौढ घोषित करण्याच्या अर्जावर ४ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. मुलाला प्रौढ ठरविण्याबाबत पोलिसांनी बाल न्याय मंडळात (जेबीबी) अर्ज दाखल केलेला आहे.त्यावर अद्याप निकाल झालेला नाही. त्या अर्जावर पुढील सुनावणी चार ऑक्टोबरला होणार आहे.

Comments
Add Comment

कर्तव्यावर असलेल्या एसटी चालकाला मारहाण; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आक्रमक

मुंबई: रस्त्यावर हॉर्न वाजवला या किरकोळ कारणावरून कर्तव्य बजावणाऱ्या एसटी चालकाला काही गुंड प्रवृत्तीच्या

Maharashtra Farmer Relief : ९४ लाख दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यांत पाच हजार जमा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाकडून मदत वितरणाची प्रक्रिया सुरू

Police Bharti : पोलीस भरतीत मासिक पाळीचा अडथळा दूर

मुंबई : पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक महिने शारीरिक चाचणीची तयारी करणाऱ्या तरुणींसाठी राज्य सरकारने

तुमच्या खात्यात 5000 रुपये जमा झाले का? राज्यातील 310 दुष्काळी तालुक्यांबाबत मोठी अपडेट!

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजाच्या शेती उत्पन्नावर आणि आर्थिक नियोजनावर मोठा परिणाम झाला

Mundhwa Land Scam: मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना आरोपी करण्याची मागणी फेटाळली

मुंबई : पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना आरोपी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका

कार्तिकी एकादशीनिमित्त एसटीच्या 1000 जादा बसेस सज्ज! एसटी महामंडळाकडून वारकऱ्यांना खुशखबर

मुंबई: महाराष्ट्राच्या भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अद्वितीय सोहळा असलेल्या कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूर