Game Changer : विदेशात ‘गेम चेंजर’चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू; राम चरण आणि कियाराला पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता!

मुंबई : दक्षिण अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Adwani) यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'गेम चेंजर' लवकरच चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. दक्षिण अभिनेता राम चरणने रविवारी संध्याकाळी 'गेम चेंजर' ऑन एक्स या चित्रपटाबाबत बहुप्रतिक्षित घोषणा केली, ज्यामुळे त्याचे परदेशी चाहते कमालीचे आनंदित झाले आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तसेच या चित्रपटामध्ये राम चरण आणि कियाराचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळणार आहे.


राम चरण आणि कियारा अडवाणी यांचा बहुप्रतिक्षित भारतातीय ड्रामा चित्रपट ‘गेम चेंजर’ १० जानेवारी २०२५ रोजी संक्रांतीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. पण त्याआधी राम चरणने गेम चेंजरच्या ॲडव्हान्स बुकींगबाबत त्याच्या एक्स आणि इंस्टाग्राम अकाउंटवर एक माहिती शेअर केली आहे, त्यानुसार परदेशात गेम चेंजर या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. राम चरण आणि शंकर या जोडीने चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडली नाही, हे पाहता गेम चेंजर हा चित्रपट नक्कीच चांगली सुरुवात करेल अशी अशा आहे. कियारा अडवाणी ही पहिल्यांदाच राम चरणसोबत चित्रपटात काम करत आहे. ‘गेम चेंजर’चा टीझर, ट्रेलर आणि गाणी या दोघांची जोडी चाहत्यांनी आधीच पसंत केली आहे. आता चाहत्यांना फक्त चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा आहे.



अभिनेता राम चरणने ही पोस्ट शेअर करून इंस्टाग्रामवर लिहिलंय की, “एक प्रचंड जागतिक वादळ सुरू झाले आहे. गेम चेंजरसाठी परदेशी बुकिंग आता सुरु झाले आहे. १०-०१-२०२५ रोजी जगभरातील थिएटरमध्ये या चित्रपटाचा अनुभव घ्या.” असे लिहून अभिनेत्याने ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. गेम चेंजरची ॲडव्हान्स बुकिंग यूके आणि उत्तर अमेरिका सारख्या परदेशातील प्रमुख चित्रपटगृहांमध्ये सुरु केली गेली आहे आणि चाहत्यांचा या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.





गेम चेंजरमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी, एसजे सूर्या, अंजली, नवीन चंद्रा, सुनील, श्रीकांत, आणि इतर अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात राम चरण वडील आणि मुलाच्या दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. दिल राजू निर्मित, या चित्रपटाच्या ध्वनिफिती थमनने संगीतबद्ध केल्या आहेत, ज्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांची मने आधीच जिंकली आहेत.

Comments
Add Comment

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?