Cold updates : जानेवारी अखेरपर्यंत राहणार थंडीचा प्रभाव

पुणे : राज्यातील थंडीत चढ उतार होत असून, थंडीच प्रभाव जानेवारी अखेरपर्यंत राहण्याचा अंदाज (Cold updates) वर्तविण्यात आला आहे.


गेले काही दिवस राज्यात थंडी जोर वाढला आहे. अनेक भागातील कमाल तसेच किमान तापमान घटले आहे. गेल्या २४ तासात काही भागात कमाल तापमान १ ते ३ अंश सेल्सिअसने वाढल्याने उबदारपणा जाणवत आहे. मात्र मंगळवारनंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढणार आहे. रविवारपर्यंत थंडीची अशीच स्थिती असेल.



याबाबतीत बोलताना ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, सध्या मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात दुपारी ३ चे कमाल तापमान सरासरीच्या जवळपास एक डिग्रीने कमी तर पहाटेचे किमान एक डिग्रीने वाढलेले जाणवत आहे. त्यामुळे तेथे दिवसा आल्हाददायकपणा तर रात्री थंडीऐवजी ऊबदारपणा जाणवत आहे. थंडीचा हा प्रभाव, बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रावर आर्द्रता आणणाऱ्या वाऱ्यामुळे पुढील आठवडाभर म्हणजे रविवार दि. १८ जानेवारी पर्यंत असाच कमी जाणवणार आहे. आठवड्यानंतर मात्र, त्यापुढील तीन दिवस म्हणजे, सोमवार दि. १९ ते २१ जानेवारी दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा काहीशी थंडी जाणवेल, असे वाटते.


थोडक्यात जानेवारी महिन्याच्या उर्वरित दिवसात थंडीचा चढ-उतार असाच जाणवेल, असे वाटते. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाणवत नाही.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : दुष्काळाचा पंचनामा शेतकऱ्यांसमोरच होणार - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

विकासकामांऐवजी शेतकरी प्राधान्यक्रमावर, परिस्थितीनुसार मदतीचे स्वरूप बदलणार मुंबई : दुष्काळी परिस्थितीत

DCM Sunetra Pawar News: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून परभणी जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी, शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या व्यथा

परभणी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी दुष्काळग्रस्त भागाचा

ST Bus NCMC Card : ज्येष्ठ नागरिक-महिलांसाठी महत्त्वाची बातमी ! १ ऑक्टोबरपासून ST बसच्या सवलतीसाठी NCMC कार्ड अनिवार्य

ST Bus NCMC Card : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक,

Nitesh Rane : शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी मंत्री नितेश राणे छत्रपती संभाजीनगर-जालना दौऱ्यावर

Mumbai : राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, नुकसानग्रस्त मच्छीमार बांधव आणि

महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना नेमके काय मिळणार ?

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी

"मी मराठवाड्याची लेक, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही!" दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची आश्वसक हाक

नांदेड: "मी मराठवाड्याची लेक आहे,