जामखेडमध्ये चारचाकी विहिरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

अहमदनगर : अहमदनगरच्या जामखेड परिसरातील जांबवाडी येथे रस्त्या लगतच्या विहिरीत चारचाकी वाहन कोसळून झालेल्या अपघातात ४ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.


यासंदर्भातील माहितीनुसार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने चारचाकी वाहन थेट विहिरीत जाऊन पडले. त्यामुळे वाहनातील ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या वाहनात रामहरी गंगाधर शेळके, किशोर मोहन पवार, अशोक विठ्ठल शेळके आणि चक्रपाणी सुनिल बारस्कर आदींचा समावेश होता.


अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कठडा व पायऱ्या नसलेल्या या विहिरीत दोरखंड लावून काही युवकांना उतरवले. त्यांनी बुडालेल्या चारही युवकांना विहिरीतून बाहेर काढले. यावेळी मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. पोलीस निरीक्षक महेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी असलेली गर्दी हटवली.


सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व समर्थ हॉस्पिटलच्या रूग्णवाहिकेने चारही जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हे चारही मृतदेह शवविच्छेदन गृहात शवविच्छेदनसाठी नेण्यात आले. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Water Metro Project : मुंबई वॉटर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यासाठी दोन सल्लागार कंपन्यांची नियुक्ती

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करून प्रवाशांना जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून

अन्न व औषध प्रशासनाची मोठी धडक कारवाई; 1.27 कोटींचा अन्नसाठा जप्त, 12 परवाने निलंबित व 6 व्यवसाय बंद

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महाराष्ट्रात अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर बडगा उगारला

Chandrashekhar Bawankule : ओबीसी कल्याणासाठी 6,840 कोटींच्या निधीची शिफारस; जानेवारीत राज्यभर 500 विशेष शिबिरे

मुंबई : राज्यातील ओबीसी आणि 18 पगड जातींच्या कल्याणासाठी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांच्या

कोल्हापुरातील बाहुबली आणि कुंथुगिरी तीर्थक्षेत्रांचा विकास होणार; 18 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन महत्त्वाची जैन तीर्थक्षेत्रं असलेल्या बाहुबली आणि कुंथुगिरी यांच्या सर्वांगीण

Eknath Shinde : दुर्धर आजारांवरील उपचारांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेत निदान आणि उपचार मिळावेत, तसेच महागड्या उपचारांचा

Nitesh Rane : बंदर प्रकल्पांसोबत स्थानिक युवकांना कौशल्य प्रशिक्षण द्या- मंत्री नितेश राणे

मुंबई : वाढवण, दिघी आणि कोकणातील प्रमुख बंदर प्रकल्पांच्या परिसरातील स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध