Suicide: पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

नाशिक : प्रेमविवाह केलेल्या पत्नीकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून पतीने व्हिक्टोरिया पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या(Suicide) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मनोहर नथू गवांदे (रा. उल्हासनगर, जि. ठाणे) यांचा मुलगा प्रीतम नथू गवांदे व आरोपी भारती गवांदे (वय ३२, दोघेही रा. पाथर्डी फाटा) यांनी प्रेमविवाह केला होता. दरम्यान, लग्नानंतर कोरोनाच्या साथीमुळे प्रीतम आर्थिक संकटात सापडला. त्यामुळे आरोपी पत्नीने "मी तुझ्याशी प्रेम करून फसले. तू भिकारी आहेस. मला घटस्फोट दे," असे म्हणून पती प्रीतम याला वडिलांकडून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली; मात्र त्यास प्रीतमने नकार दिला असता आरोपी पत्नीने त्याच्याशी वेळोवेळी भांडण करून वाद घातला. त्यानंतर पत्नीला परपुरुषाबरोबर आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्याने त्याचा संताप झाला.

प्रीतमला पत्नीने शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले. प्रीतमने दि. १२ ऑगस्ट रोजी व्हिक्टोरिया पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी मयत प्रीतमचे वडील मनोहर गवांदे यांनी न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार पती प्रीतम याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी भारती गवांदेविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

Virar crime news : सवतीचा राग अनावर! नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोवर चाकू अन् त्रिशूळने प्राणघातक हल्ला; विरारमधील धक्कादायक घटना

विरार : पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच संतापाच्या भरात एका महिलेने तिच्या सवतीवर चाकू आणि त्रिशूळने

Dhule : मनमाड–इंदूर रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, संयुक्त मोजणीचे पथक माघारी

Dhule : मनमाड–इंदूर रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित भूसंपादनाच्या संयुक्त मोजणीला अवधान परिसरातील शेतकऱ्यांनी

Ramabai Ranvir : लेकींच्या शिक्षणासाठी ४७ वर्षीय आईची अनोखी जिद्द; चप्पल तुटली, अनवाणी धावली अन् ३ किमीची शर्यत जिंकली!

पुणे : मुलांच्या भविष्यासाठी आई कोणत्याही संकटाला सामोरं जाण्यास तयार असते, याचं प्रेरणादायी उदाहरण पुण्यात

Jalgaon : चाळीसगावमध्ये भीषण अपघात ! भरधाव कारने तीन महिलांना उडवले, एकीचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर बिलाखेड

Sangli crime news : तोंडातून पांढरा फेस अन् उग्र वास; कौटुंबिक वादातून पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू; सांगलीत खळबळ

सांगली : सांगली जिल्ह्यातील पलूस शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. घरगुती वादाच्या कारणावरून एका

Jalgaon Crime : धावत्या रेल्वेत दिवा लावून पूजा, प्रवाशावर रेल्वेची कारवाई

Jalgaon Crime : धावत्या रेल्वेच्या डब्यात दिवा लावून धार्मिक विधी करणाऱ्या प्रवाशाविरुद्ध मध्य रेल्वेने कारवाई केली