चिनाब रेल्वे पूल हा जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कौरी दरम्यान आहे. हा पूल चिनाब नदीवर ३५९ मीटर उंचीवर उभारण्यात आला आहे. हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे तसेच हा जगातील सर्वात उंच कमानी पूल आहे. जम्मू काश्मीरमधील थंड वातावरणाचा विचार करुन वंदे भारत एक्सप्रेसमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे गाडी थंडीच्या दिवसांतही आरामात प्रवास करू शकेल. वंदे भारत गाडीची लोकप्रियता फक्त देशातच नाही तर परदेशातही वाढू लागली आहे. अनेक देशांनी भारतातून सेमी-हायस्पीड वंदे भारत आयात करता येतील का ? याबाबत चौकशी सुरू केली आहे. भारतात पहिली वंदे भारत एक्सप्रेस १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली-कानपूर-अलाहाबाद-वाराणसी मार्गावर धावली. ही गाडी ताशी १६० किमी वेगाने धावली. यानंतर वंदे भारत गाड्या देशात वेगवेगळ्या मार्गांवर धावू लागल्या आहेत. वंदे भारतच्या काचेवर कधीही बर्फ जमा होत नाही. ही गाडी उणे ३० अंश से. तापमानातही धावू शकते. या गाडीची काही वैशिष्ट्ये विमान प्रवासाशी मिळतीजुळती आहेत. यामुळे वंदे भारत गाड्यांतून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.Three engineering marvels of Bharat;
🚄 Vande Bharat crossing over Chenab bridge and Anji khad bridge. 📍Jammu & Kashmir pic.twitter.com/tZzvHD3pXq — Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) January 25, 2025






