शिवरायांचा पुतळा उभारताना त्रुटी नको - मंत्री नितेश राणे

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीबाबत बैठक


मुंबई : राजकोट, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा नव्याने पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळा उभारणीच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.


मालवण येथे उभारण्यात येत असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नूतन पुतळ्याबाबत आज मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी मंत्री राणे बोलत होते.


पुतळा उभारणीच्या कामाची सविस्तर माहिती घेऊन मंत्री राणे म्हणाले की, या कामामध्ये त्रुटी नसाव्यात. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. राजकोट बंदर येथील हवामान आणि वाऱ्याचा वेग याचा पूर्ण अभ्यास करून पुतळा उभारणी करा. यासाठी कोणतीही घाई करण्यात येऊ नये, असे मंत्री राणे म्हणाले.



पुतळा उभारताना एकूण तीन आधार या पुतळ्याला देण्यात येत आहेत. पायापासून वरपर्यंत अखंड आधार असणार आहेत. सी ९०३०० ब्राँझ धातूचा वापर करण्यात येत आहे. हात आणि तलवार यांच्या मजबुतीसाठी केबल वापरण्यात येत असल्याची माहिती शिल्पकार अनिल राम सुतार यांनी दिली.


बैठकीस सार्वजनिक बांधकाम कोकण प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अवर सचिव दीपाली घोरपडे, सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, आयआयटी पवईचे तज्ज्ञ आर एस जांगिड आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Shirdi Five Star Hotel: शिर्डीत उभारणार ताज समूहाचे पंचतारांकित हॉटेल; फडणवीसांच्या उपस्थितीत करार!

मुंबई: शिर्डी विमानतळ परिसरातील पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून पंचतारांकित

Marathi Serial Updates: झी मराठीवर या आठवड्यात मनोरंजनाचा तडका; पाहा मालिकांमध्ये काय घडणार?

Marathi Serial Updates: मनोरंजन विश्वात प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या झी मराठीवरील मालिकांमध्ये सध्या अनेक मनोरंजक घडामोडी

Ashish Shelar: रोहित पवारांवर आशिष शेलारांचा घणाघात; म्हणाले, 'हे तर राजकीय नीचपणाच!'

Ashish Shelar: भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी अनेक विषयावर

MSRTC Record Collection: लालपरीची दिवाळी जोरात! एका दिवसात कमावले 46.53 कोटी रुपये

मुंबई:  दिवाळीचा आनंद, सलग सुट्ट्यांची पर्वणी आणि गावी जाण्यासोबतच परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांनी महाराष्ट्र

Nirmal Singh Ji Maharaj: गुरुजींच्या महासत्संगात बॉलिवूड सेलिब्रिटी भावुक; भूमी पेडणेकर, हिमेश रेशमियांचे व्हिडिओ व्हायरल!

Nirmal Singh Ji Maharaj: अध्यात्मिक गुरू निर्मल सिंह जी महाराज (छतरपुर वाले गुरुजी) यांच्या महासत्संगातील बॉलिवूड

Painjan Song: पैंजणाच्या नादात खुलणार प्रेमाची कहाणी; अक्षय वाघमारे-रुचिरा जाधवची नवी जोडी

Painjan Song: डोंगरदऱ्या, हिरवीगार शेतं आणि गावाकडचं सुंदर वातावरण, अशा निसर्गरम्य परिसरात फुलणारी प्रेमकहाणी सांगणारं