UPSC CSE Result : 'यूपीएससी'चा निकाल जाहीर! महाराष्ट्राचा अर्चित डोंगरेने मारली बाजी

नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी लाखो इच्छुकांचा सहभाग दिसून येतो. ही परीक्षा भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलिस सेवा (IPS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय महसूल सेवा, भारतीय व्यापार सेवा आणि इतर गट अ (A) आणि ब (B) केंद्रीय सेवांसारख्या प्रतिष्ठित पदांसाठी प्रवेशद्वार म्हणून घेण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत यूपीएससी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्राने बाजी मारली आहे. (UPSC CSE Result)



यंदाच्या यूपीएससी परीक्षेत उत्तरप्रदेश प्रयागराजयेथील शक्ति दुबे या विद्यार्थ्याने देशात पहिला क्रमांक पटकावला असून हर्षिता गोयल देशात दुसरी आली आहे. तर महाराष्ट्राचा अर्चित डोंगरेने देशात तिसरा क्रमांक पटकावत बाजी मारली आहे.



एकूण १००९ उमेदवार यूपीएससी उत्तीर्ण 


केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) २०२४ च्या नागरी सेवा परीक्षामध्ये नियुक्तीसाठी एकूण १,००९ उमेदवारांची निवड केली आहे. या उमेदवारांना भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय पोलिस सेवा (IPS) आणि इतर केंद्रीय सेवा (गट अ आणि ब) या पदांवर नियुक्त केले जाईल. निवडलेल्या उमेदवारांमध्ये विविध श्रेणीतील उमेदवारांचा समावेश आहे, ज्यामध्ये सामान्य श्रेणीतील ३३५, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS), ३१८ इतर मागासवर्गीय (OBC), १६० अनुसूचित जाती (SC) आणि ८७ अनुसूचित जमाती (ST) यांचा समावेश आहे. (UPSC CSE Result)



दिव्यांग श्रेणीतून ४५ उमेदवारांची निवड


अपंग व्यक्ती (PWBD) श्रेणी अंतर्गत एकूण ४५ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी १२ उमेदवार PWBD-१ (दृष्टीहीन), ८ उमेदवार PWBD-२ (श्रवणहीन), १६ उमेदवार PWBD-३ (गतिशीलता कमजोरी) आणि ९ उमेदवार PWBD-५ (इतर अपंगत्व) आहेत.



कसा पहाल निकाल?


यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना प्रथम यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर, होमपेजवरील "नवीन काय आहे" विभाग किंवा थेट "निकाल" लिंकवर क्लिक करा. त्यानंतर, नागरी सेवा परीक्षा (CSE) निकालाच्या लिंकवर क्लिक करा. येथे तुम्हाला एक PDF फाइल मिळेल ज्यामध्ये उत्तीर्ण उमेदवारांची नावे आणि रोल नंबर असतील. तुम्ही तुमचे नाव किंवा रोल नंबर शोधून निकाल पाहू शकता.

Comments
Add Comment

यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या बसला भीषण आग ! बसमध्ये 40 प्रवाशांची आरडाओरड अन्...; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा येथे यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या प्रवासी बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली.

उत्तर प्रदेशातील मत्स्यपालनाला मिळणार जागतिक बळ; गोरखपूरमध्ये 'वर्ल्डफिश सेंटर'चे कार्यालय!

लखनौ: 'वर्ल्डफिश सेंटर' उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे मत्स्यपालन प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात आले. यावेळी

भारताची अमेरिकेला निर्यात 11 टक्क्यांनी वाढली; सहा महिन्यांत 50.80 अब्ज डॉलरची निर्यात

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यात प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारासाठी (BTA) वाटाघाटी सुरू असतानाच

Microsoft 365 ची सेवा पुन्हा रुळावर! Outlook सेवा पूर्ववत; जगभरातील युजर्सना मोठा दिलासा!

मुंबई: नोकरदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या 18 तासांपासून बंद असलेलं मायक्रोसॉफ्ट आऊटलूक (Microsoft Outlook)ची सेवा

Winter Destinations: हिवाळ्यात फिरण्याचा प्लॅन करताय? भारतातील 'ही' ६ ठिकाणं आहेत पर्यटनासाठी परफेक्ट!

[caption id="attachment_1074920" align="alignnone" width="800"] 1.मनाली, हिमाचल प्रदेशबर्फाच्छादित पर्वत, सुंदर दऱ्या आणि थंड वातावरणासाठी मनाली

India first LED Dome Planetarium : म्हैसूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या 'एलईडी डोम' तारांगणाचे उद्घाटन!

म्हैसूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi)  यांनी शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) म्हैसूर विद्यापीठ परिसरात देशातील