साई संस्थानच्या रुग्णालयात गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

रुग्णालयातील डॉक्टरांचे आणि संपूर्ण टीमचे सर्वत्र कौतुक


शिर्डी: शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान रुग्णालयात ६५ वर्षीय रुग्णावर अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. या यशस्वी प्रयत्नाबद्दल रुग्णालयातील डॉक्टरांचे आणि संपूर्ण टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.


नांदेड जिल्ह्यातील चांडोळा गावचे ६५ वर्षीय प्रल्हाद महाजन साखरे यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या हृदयाच्या वॉलमध्ये छिद्र (Ventricular Septal Rupture) निर्माण झाले होते. अनेक नामांकित रुग्णालयांतील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेतील सांभाव्य धोका पाहता त्यांना नकार दिला होता. अखेरचा उपाय म्हणून त्यांनी श्री साईबाबा रुग्णालयात धाव घेतली. येथेही संभाव्य धोका स्पष्ट करून डॉक्टरांनी कुटुंबीयांचा निर्णय मागितला. साईबाबांवरील श्रद्धेने प्रेरित होऊन कुटुंबीयांनी शस्त्रक्रियेस परवानगी दिली.



श्री साईबाबा रुग्णालयात ही अशी पहिलीच शस्त्रक्रिया


अखेर दिनांक २४ मे रोजी प्रल्हाद साखरे यांना श्री साईबाबा संस्थान रुग्णालयात दाखल केले. कार्डियाक सर्जन डॉ. श्रेयस पोतदार, भुलतज्ञ डॉ. गायत्री लक्ष्मी नागपुरे,अतिदक्षता तज्ञ डॉ.विजय नरोडे,न्युरोसर्जन डॉ मुकुंद चौधरी आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ. निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.  महत्वाची गोष्ट म्हणजे, श्री साईबाबा रुग्णालयात ही अशी पहिलीच शस्त्रक्रिया होती. संबंधित रुग्ण आता पूर्णपणे बरे झाले असून, आज, २ जून २०२५ रोजी त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. रुग्णाचे बंधू, खुशालराव साखरे यांनी डॉक्टरांचे विशेष आभार मानले आणि आनंदाश्रूंनी आपली भावना व्यक्त केली.


या यशस्वी प्रयत्नाबद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, वैद्यकीय संचालक लेफ्ट. कर्नल डॉ. शैलेश ओक आणि उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

Comments
Add Comment

गोंदियातील पालावरच्या शाळेतील 30 मुलांनी घेतली राज्यपालांची भेट; पहिल्यांदाच समुद्र पाहून मुलांचा आनंद गगनात

[caption id="attachment_1074552" align="aligncenter" width="800"] गोंदिया जिल्ह्यातील कुडवा येथील पालावरच्या शाळेत शिकणाऱ्या मांग गारुडी समाजातील 30

Devendra Fadanvis: कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारी पिके विकसित करा; देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

नागपूर: रामटेक तालुक्यातील कवडक येथे दत्ता मेघे फाऊंडेशन नागपूरद्वारा संचालित स्व. दत्ता मेघे स्मृती दालन,

दिल्लीच्या व्यापार मेळ्यात झळकणार महाराष्ट्राचा वैभवशाली वारसा; 14 नोव्हेंबरला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दालनाचे उद्घाटन

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत आयोजित यंदाच्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात 'भागीदार राज्य' म्हणून

आपण निसर्गाचे मालक नाही, तर त्याचा एक भाग; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

मुंबई : "निसर्गावर माणसाचे स्वामित्व नसून, माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे. जैवविविधता आणि पर्यावरणाचे संतुलन

Mumbai Bomb Threat: मुंबई-पुण्याला बॉम्बस्फोटाची धमकी! महापौर कार्यालयासह 5 ठिकाणे रडारवर

Mumbai Bomb Threat: मुंबईसह पुण्यातदेखील बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा मेल आला आहे. मुंबईमध्ये महापौरांच्या कार्यालयाचा

Amul milk price hike : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री; अमूल दूध, सर्फ एक्सेल आणि गोल्ड फ्लेक महागले, जाणून घ्या नवे दर

मुंबई : गेल्या काही महिन्यांत दैनंदिन वापरातील अनेक महत्त्वाच्या वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य