गोंदियातील पालावरच्या शाळेतील 30 मुलांनी घेतली राज्यपालांची भेट; पहिल्यांदाच समुद्र पाहून मुलांचा आनंद गगनात

गोंदिया जिल्ह्यातील कुडवा येथील पालावरच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या मांग गारुडी समाजातील 30 मुलामुलींनी मुंबईतील लोकभवन येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भेट घेतली. रोजगारासाठी पालकांचे सतत स्थलांतर होत असल्याने शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या या मुलांना मुंबई दर्शनाची संधी मिळाली. नेहरू विज्ञान केंद्र, सिद्धिविनायक मंदिर आणि विधान भवन पाहिल्यानंतर समुद्राचे दर्शन हा त्यांच्या आनंदाचा खास क्षण ठरला. यावेळी मुलांनी राज्यपालांसमोर भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय पाठ करून दाखवला. राज्यपालांनी मुलांचे कौतुक करत शिक्षण, शिस्त आणि उज्ज्वल भविष्याचा संदेश दिला.

1/5 गोंदिया जिल्ह्यातील कुडवा येथील पालावरच्या शाळेत शिकणाऱ्या मांग गारुडी समाजातील 30 मुलामुलींनी मुंबईतील लोकभवन येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी मुलांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शिक्षणाची आणि अनुभवांची माहिती जाणून घेतली.

2/5 मुंबई दर्शनादरम्यान या मुलांनी पहिल्यांदाच अथांग समुद्र पाहिला. नेहरू विज्ञान केंद्र, सिद्धिविनायक मंदिर आणि विधान भवनाला भेट दिल्यानंतर समुद्राचे दृश्य त्यांच्यासाठी सर्वाधिक आकर्षण ठरले. समुद्र पाहिल्यानंतरचा आनंद मुलांनी राज्यपालांशी संवाद साधताना व्यक्त केला.

3/5 लोकभवन येथे झालेल्या भेटीदरम्यान मांग गारुडी समाजातील 30 विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय मुखोद्गत म्हणून दाखवला. मुलांचे पाठांतर आणि स्पष्ट उच्चार पाहून राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

4/5 भटक्या विमुक्त विकास परिषद आणि भटके विमुक्त कल्याणकारी परिषद यांच्या माध्यमातून पालावरच्या शाळा चालविल्या जात आहेत. रोजगारासाठी पालकांचे विविध राज्यांत स्थलांतर होत असल्याने मुलांचे शिक्षण खंडित होते. अशा मुलांना शिक्षण, संस्कार आणि शिस्तीचे धडे देण्याचे महत्त्वपूर्ण काम या उपक्रमातून केले जात आहे.

5/5 राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुलांना नियमित अभ्यास करण्याचा, आरोग्याची काळजी घेण्याचा आणि चांगले नागरिक बनण्याचा सल्ला दिला. शिक्षणासोबत रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याची सूचनाही त्यांनी केली. आगामी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना पुणे दर्शन घडविण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Comments
Add Comment

Devendra Fadanvis: कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारी पिके विकसित करा; देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

नागपूर: रामटेक तालुक्यातील कवडक येथे दत्ता मेघे फाऊंडेशन नागपूरद्वारा संचालित स्व. दत्ता मेघे स्मृती दालन,

दिल्लीच्या व्यापार मेळ्यात झळकणार महाराष्ट्राचा वैभवशाली वारसा; 14 नोव्हेंबरला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दालनाचे उद्घाटन

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत आयोजित यंदाच्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात 'भागीदार राज्य' म्हणून

आपण निसर्गाचे मालक नाही, तर त्याचा एक भाग; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

मुंबई : "निसर्गावर माणसाचे स्वामित्व नसून, माणूस हा निसर्गाचाच एक भाग आहे. जैवविविधता आणि पर्यावरणाचे संतुलन

Mumbai Bomb Threat: मुंबई-पुण्याला बॉम्बस्फोटाची धमकी! महापौर कार्यालयासह 5 ठिकाणे रडारवर

Mumbai Bomb Threat: मुंबईसह पुण्यातदेखील बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा मेल आला आहे. मुंबईमध्ये महापौरांच्या कार्यालयाचा

Amul milk price hike : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री; अमूल दूध, सर्फ एक्सेल आणि गोल्ड फ्लेक महागले, जाणून घ्या नवे दर

मुंबई : गेल्या काही महिन्यांत दैनंदिन वापरातील अनेक महत्त्वाच्या वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्य

फटाके फोडायला गेला अन् 50 फूट खोल दरीत कोसळला, पनवेलमध्ये 16 वर्षीय मुलाचा थरारक बचाव

दिवाळीचा आनंद साजरा करताना एक क्षणाचा निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो, याचा धक्कादायक अनुभव पनवेलमध्ये एका