'कांतारा २' मध्ये असा दिसतो रिषभ शेट्टी.. आक्रमक अवतार बघून प्रेक्षक घाबरले

कांतारा १ च्या अभूतपूर्ण प्रसिद्धीनंतर आता कांताराच्या दुसऱ्या भागाबद्दल प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आहे कारण कांतारा २ च पोस्टर रिषभ शेट्टी याच्या वाढदिवसाचं निमित्त साधून प्रेक्षकांसमोर आणण्यात आला आहे. २०२२ मध्ये कांतारा सिनेमा रिलीज झाला होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलीच कमाई केली. आता २ ऑक्टोबरला कांतारा २ हा सिनेमा सिनेमगृहात येणार आहे. या चित्रपटच पोस्टर बघूनच प्रेक्षक भारावून गेले आहेत. तशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.





या पोस्टरमध्ये आपल्याला रिषभच्या मागे अग्निकांकण दिसत आहे. यामधून तो योध्याच्या स्वरूपात आपल्याला एक हातात ढाल तर दुसऱ्या हातात कुऱ्हाड घेऊन अतिशय आक्रमक पद्धतीने झेप घेताना दिसत आहे. या ढालीवर अनेक बाण रुतताना दिसत आहेत तर मागून अग्निज्वालादेखील येताना दिसत आहेत. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग आणि सूड घेण्याची भावना दिसून येत आहे. त्याचा आक्रमक चेहरा एक प्रभावी योध्याचे गुण दर्शवत आहे.

रिषभ शेट्टी याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत निर्मात्यांनी हे पोस्टर प्रेक्षकांसमोर आणल आहे. याला कॅप्शन देताना इथे आख्यायिका जन्म घेतात आणि गर्जना होते असं म्हटलं आहे. कांतारा १ मध्ये रिषभ शेट्टी आपल्याला पाठमोरा दिसला होता तेव्हादेखील तो योध्याच्या भूमिकेत होता मात्र तेव्हा त्याच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कुऱ्हाड होती. रिषभ शेट्टी याला कांतारा १ मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. जिथून पहिला भाग संपला त्यानंतर लगेच दुसऱ्या भागाचं कथानक सुरु होणार आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी