Eknath Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची आर्थिक झेप अभिमानास्पद

मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले रक्तदान


स्वर्गीय दिघे साहेबांची परंपरा पुढे नेत रक्तदाते आणि डॉक्टरांचा केला सन्मान


मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकवण्याचा केला निर्धार


ठाणे : “नवीन वर्षात देशाचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक प्रगतीत मोठी झेप घेतली आहे. जपानसारख्या प्रगत देशाला मागे टाकत भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत चौथा क्रमांक पटकावला असून देश आर्थिक महासत्तेकडे वेगाने वाटचाल करत आहे. ही बाब १४० कोटी भारतीयांसाठी अभिमानाची, आनंदाची आणि गौरवाची आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांनी ठाण्यात सुरू केलेल्या मध्यरात्रीचे रक्तदान शिबिर या उपक्रमात सहभागी होऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रक्तदान केले. या उपक्रमात सहभागी झालेले सर्व रक्तदाते आणि डॉक्टरांना यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दिघे साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा आजही ठाण्यात अव्याहतपणे सुरू असल्याचे सांगितले.



पुढे बोलताना त्यांनी, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आज आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे. लवकरच भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. देशाचे नाव जगभर उज्वल करण्याचे काम मोदीजी करत असल्याचे सांगितले.” तसेच नवीन वर्षात केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेल्या मोठ्या विकासात्मक भेटीचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “नाशिक ते अक्कलकोट ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग मंजूर झाला असून समृद्धी महामार्गाप्रमाणेच हा प्रकल्पही महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरणार आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानतो.” यावेळी त्यांनी आगामी ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकांबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. “येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचाच भगवा बृहन्मुंबई महानगरपालिकांवर फडकणार आहे. मुंबईकरांचा विकास, सुरक्षितता आणि सुव्यवस्थित कारभारासाठी महायुतीला मोठे समर्थन मिळेल,” असे विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचाही उल्लेख करत ते म्हणाले, “बाळासाहेबांचा ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा मंत्र आम्ही आचरणात आणत आहोत. जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यभर आरोग्य शिबिरे, वैद्यकीय तपासण्या आणि विविध सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले जाणार आहेत.” तसेच आगामी वर्ष शेतकरी, कष्टकरी, वारकरी, व्यापारी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि महाराष्ट्रातील साडेतेरा कोटी जनतेसाठी सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद घेऊन येवो,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ. मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक पवन कदम, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Add Comment

Nashik Crime : दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, चौघे जेरबंद

Nashik Crime : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या दिवसा घरफोडीच्या मालिकेचा अखेर

PM Modi SCO Summit 2026 : दहशतवादावर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला थेट संदेश; ‘दहशतवादाबाबत दुहेरी मापदंड नको’

बिश्केक : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) २६व्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी

Navnath Ban : ‘देवाभाऊ हे संजय राऊतांसारख्या माफियांचे कर्दनकाळ’; नवनाथ बन यांचा जोरदार हल्लाबोल

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांच्यातील राजकीय

Nashik : देव तारी त्याला कोण मारी...७५ वर्षीय आजीची दोन दिवस अंधाऱ्या विहिरीत मृत्यूशी झुंज, दोन दिवसांनी सुखरूप बाहेर

Nashik : देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय चांदवड शहरातील नागरिकांना आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद