सातारच्या ऐतिहासिक भूमीत ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ

ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपरिक आठवणी


सातारा : सातारच्या ऐतिहासिक नगरीत साहित्य आणि विचारांच्या अभूतपूर्व संगमातून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला. ‘स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी’ येथे ध्वजारोहणाच्या मंगल सोहळ्याने या साहित्यकुंभाचा शुभारंभ झाला. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा-शाहूपुरी (सातार) आणि मावळा फौंडेशन, सातारा आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने सातारा येथे १ ते ४ जानेवारी दरम्यान या साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे.


अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते संमेलनाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ९८ व्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले. साहित्याच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या विविध कट्ट्यांचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. कवी कट्टयाचे उद्योजक भालचंद्र जोशी यांच्या हस्ते व रवींद्र बेडकीहाळ यांच्या उपस्थितीत तर गझल कट्टयाचे उद्घाटन समंलनाचे स्वागत अध्यक्ष भोसले यांच्या हस्ते झाले. प्रकाशन कट्टयाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष श्रीमंत भोसले म्हणाले,“साहित्यातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या स्वागतासाठी सातारकर सज्ज आहेत. स्वागताची कोणतीही उणीव भासू नये, यासाठी प्रशासन आणि आम्ही सर्वजण मनोभावे प्रयत्न करत आहोत. हे संमेलन सातारच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरेल.


यावेळी संमेलनाचे अध्यक्ष पाटील म्हणाले, या संमेलनासाठी सातारकरांमध्ये मोठा उत्साह आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहित्य आणि रसीक मंडळी आलेली आहेत. त्यांचा उत्साह पाहून आम्हाला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. साहित्यशारदेच्या या उत्सवात सातारा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील, संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यिक, रसिक सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


साताऱ्यात होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीने महाराष्ट्र राज्याची संस्कृती परंपरा संत वाङ्ममय आणि साहित्य यांच्या आठवणी निश्चितपणे जागवल्या. राजवाडा येथून ग्रंथ दिंडीची सुरुवात झाली. या ग्रंथदिंडीमध्ये ५५ शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. पर्यावरण, साताऱ्यातील पर्यटन, संत साहित्य, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व थोर समाज सुधारक महात्मा फुले यांची शिक्षण चळवळ, संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई यांनी केलेला संतपरंपरेचा प्रसार अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी चित्र सादर केले.

Comments
Add Comment

स्मृती मंधानाच्या नेतृत्वात भारतीय संघाचा पहिला मालिका विजय, झिम्बाब्वेला नऊ विकेट्सने केलं पराभूत

मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग 2 सामन्यांत भारताने विजय

Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार! सुदैवाने अभिनेता सुरक्षित; लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित दावा?

मुंबई: बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता टायगर

Amrit Bharat Express: मुंबई ते अयोध्या 11 जनरल डब्यांसह अमृत भारत एक्स्प्रेस… महाराष्ट्रात कुठे कुठे असेल थांबा?

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा या सणानिमित्त मुंबईहून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर प्रवासी जात असतात. दरवर्षीची

DCM Eknath Shinde: सरनाईकांच्या विजयाची जबाबदारी आमची; शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न नक्की सोडवणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ग्वाही

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी शाळा आणि शिक्षकांसाठी

FDA Action: छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातही FDA ची धडक कारवाई, रिलायन्स स्टोरेज आणि ब्लिंकिटच्या कोल्ड स्टोरेजवर धाड सत्र

महाराष्ट्र: छत्रपती संभाजीनगर, पुण्यासह इतरत्र जिल्ह्यामध्ये अन्न- औषध प्रशासनाने धडक कारवाई करत लाखोंचा

Deputy Chief Minister Eknath Shinde: अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेंचा ‘डॅमेज कंट्रोल’; सरनाईकांसाठी बंडखोरी शमवली

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराला