मुंबईत राहून पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्यांची मस्ती देवाभाऊंचे बुलडोझर उतरवतील! - मंत्री नितेश राणेंचा इशारा; नायगावातील सलूनमध्ये वाजले 'कश्मीर बनेगा पाकिस्तान' गाणे

मुंबई : मुंबईनजिक पालघर जिल्ह्यातील नायगावात एका सलूनमध्ये 'कश्मीर बनेगा पाकिस्तान' गाणे वाजवल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, मुंबईत राहून पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्यांची मस्ती देवाभाऊंचे बुलडोझर उतरवतील, असा इशाराही दिला आहे.


१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी दीडच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक पंकज किलजे गस्तीवर असताना, त्यांना 'रूहान हेअर कटिंग सलून'मधून 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' हे वादग्रस्त गाणे ऐकू आले. नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोटी परिसरात हा प्रकार घडला. हे गाणे पाकिस्तानच्या 'इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशन्स'ने भारताच्या विरोधात प्रोपेगेंडा म्हणून तयार केलेले आहे. हे गाणे वाजवून भारताची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला आव्हान दिले जात असल्याचे तसेच समाजात द्वेष आणि अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.


त्यामुळे पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून अब्दुल रहमान सदरुद्दीन शाह (वय २५) या आरोपीला अटक केली. तो मूळचा आझमगढ उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. आरोपी आपल्या मोबाईलवरून ब्लूटूथद्वारे स्पिकरवर हे गाणे मोठ्या आवाजात लावत होता, जेणेकरून रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना ते ऐकू जावे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. पोलिसांनी तातडीने सलूनवर छापा टाकून आरोपीचा मोबाईल जप्त केला, ज्यामध्ये हे गाणे सुरू असल्याचे आढळले. नायगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १९७(१)(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.



मंत्री नितेश राणे संतप्त


राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी या प्रकाराबाबत चीड व्यक्त केली. "मुंबईत राहून 'कश्मीर बनेगा पाकिस्तान'चे नारे चालणार नाहीत. यांची सगळी मस्ती आमच्या देवाभाऊचे बुलडोझर उतरवतील! जय श्री राम", असा इशारा त्यांनी दिला.

Comments
Add Comment

स्मृती मंधानाच्या नेतृत्वात भारतीय संघाचा पहिला मालिका विजय, झिम्बाब्वेला नऊ विकेट्सने केलं पराभूत

मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग 2 सामन्यांत भारताने विजय

Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार! सुदैवाने अभिनेता सुरक्षित; लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित दावा?

मुंबई: बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता टायगर

Amrit Bharat Express: मुंबई ते अयोध्या 11 जनरल डब्यांसह अमृत भारत एक्स्प्रेस… महाराष्ट्रात कुठे कुठे असेल थांबा?

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा या सणानिमित्त मुंबईहून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर प्रवासी जात असतात. दरवर्षीची

DCM Eknath Shinde: सरनाईकांच्या विजयाची जबाबदारी आमची; शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न नक्की सोडवणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ग्वाही

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी शाळा आणि शिक्षकांसाठी

FDA Action: छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातही FDA ची धडक कारवाई, रिलायन्स स्टोरेज आणि ब्लिंकिटच्या कोल्ड स्टोरेजवर धाड सत्र

महाराष्ट्र: छत्रपती संभाजीनगर, पुण्यासह इतरत्र जिल्ह्यामध्ये अन्न- औषध प्रशासनाने धडक कारवाई करत लाखोंचा

Deputy Chief Minister Eknath Shinde: अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदेंचा ‘डॅमेज कंट्रोल’; सरनाईकांसाठी बंडखोरी शमवली

अमरावती, ता 18 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराला