सेबी अध्यक्ष तुहीन कांता पांडे यांचे मोठे विधान.....सेबी सायबर सुरक्षेसाठी एआय टूल्स विकसित करण्याच्या तयारीत?

मुंबई: सेबीने 'इज ऑफ डुईंग बिझनेस' सह घोटाळ्याविरोधात कडक कायदे व कडक अनुपालन (Compliance) लागू करत असताना आणखी सायबर सुरक्षेसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. याविषयी बोलताना सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी सांगितले आहे की, 'सेबीने नियमन केलेल्या संस्थांच्या सायबर सुरक्षेच्या तयारीचे विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधन विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे. बीएसईमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पांडे यांनी सेबी बाजार पायाभूत सुविधा संस्थांसाठी (MIIs) तंत्रज्ञान रोडमॅप विकसित करण्यासाठी एक कार्यगट स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहे असे म्हटले.


याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले आहेत की,'नियमन केलेल्या संस्थांच्या जोखीमेवर अवलंबून असलेल्या पर्यवेक्षणाला बळकटी देण्यासाठी एआय आधारित तपासणी साधन सध्या विकसित केले जात आहे असे पांडे यांनी सर्वात सेन्सेक्सच्या ४० व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना यानिमित्ताने स्पष्ट केले. सध्या मोठ्या प्रमाणात सायबर सुरक्षेचा प्रश्न भेडसावत असताना पुढे पांडे यांनी विकसित केले जाणारे हे साधन सायबर ऑडिट अहवालांचे विश्लेषण करेल नियंत्रणातील त्रुटी ओळखेल आणि संस्थांना त्यांच्या जोखमीच्या पातळीनुसार वर्गीकृत करेल असे सांगितले. तंत्रज्ञान रोडमॅप MIIs ला सिक्युरिटीज मार्केट इकोसिस्टमसाठी एक संरचित पाच वर्षांची  आणि १० वर्षांची धोरणात्मक तंत्रज्ञान दृष्टी (Technical Outlook) प्रदान करेल,असे पांडे यांनी पुढे म्हटले.


त्यांनी एक्सचेंज आणि इतर MIIs (Market Infrastructure Institutions) ना तंत्रज्ञान, जोखीम व्यवस्थापन आणि सायबर लवचिकतेमध्ये गुंतवणूक सुरू ठेवण्याचे आवाहन केले.'आपल्याला हे सुनिश्चित करावे लागेल की नावीन्यपूर्णता बाजाराची अखंडता कमकुवत नाही, तर मजबूत करते' असे ते म्हणाले.


गुंतवणूकदार वर्गातील वाढता सहभाग (Participation) आणि विविधीकरण (Diversification) या पार्श्वभूमीवर सेबी बाजाराची अखंडता टिकवून ठेवणाऱ्या नियामक रचनेला बळकटी देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, असे ते म्हणाले. 'दीर्घकाळ टिकणारे बाजार क्षणिक तेजी किंवा आशावादाच्या चक्रांवर तयार होत नाहीत. ते अशा संस्थांवर तयार होतात ज्या विश्वास निर्माण करतात, बाजारासोबत विकसित होणारे नियमन आणि सतत जुळवून घेणाऱ्या व अद्ययावत होणाऱ्या प्रणालींवर आधारित असतात' असे सेबी प्रमुख पांडे यांनी कार्यक्रमात बोलताना सूचित विधान केले आहे.

Comments
Add Comment

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीत शह-काटशहाचे राजकारण; पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुरघोड्या!

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले

IND vs WI 5th T20I: बंगळुरूत तीन बदल केले तरच टीम इंडियाचं विजयाचं गणित सुटणार! समजून घ्या

भारत आणि वेस्ट इंडिज टी20 मालिका आता रंगतदार वळणावर आहे. कारण वेस्ट इंडिजने भारतीय संघाला या मालिकेत तोडीस तोड

Unknown Calls Block Scheme : खूशखबर! फसव्या कॉल्सची आता खैर नाही; केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय!

नवी दिल्ली : अनोळखी (Unknown) नंबरवरून येणारे फेक कॉल्स आणि सायबर फसवणुकीच्या त्रासाला आता कंटाळलात का? तर तुमच्यासाठी

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा