Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड फिगर, स्टायलिश लूक आणि फिटनेसप्रती असलेली मेहनत यामुळे ती तरुणाईची फिटनेस आयकॉन बनली आहे. सध्या दिशा पुन्हा एकदा चर्चेत आली असून, यावेळी तिच्या आगामी चित्रपटामुळे नव्हे तर तिच्या लव्ह लाईफमुळे ती सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

दिशा पाटनी सध्या लोकप्रिय पंजाबी गायक तलविंदरला डेट करत असल्याच्या चर्चा जोरात सोशल मिडीयावर सुरू आहेत. तलविंदर हा आपल्या हटके स्टाईलमुळे ओळखला जातो. विशेष म्हणजे तो कधीही सार्वजनिक ठिकाणी आपला चेहरा उघड करत नाही. सोशल मीडिया असो किंवा स्टेज परफॉर्मन्स, तो कायम मास्क किंवा फेस पेंटच्या माध्यमातून आपली ओळख लपवतो. याच कारणामुळे तो चाहत्यांमध्ये आणखी रहस्यमय ठरला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तलविंदर हा दिशापेक्षा सुमारे सहा वर्षांनी लहान आहे. त्याचा जन्म २३ नोव्हेंबर १९९७ रोजी अमृतसर येथे झाला. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये वाढ झाल्यामुळे त्याच्या संगीतावर पाश्चात्य संगीताचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. तो केवळ गायकच नाही, तर गीतकार आणि संगीत निर्माता देखील आहे. त्याने प्रसिद्ध रॅपर हनी सिंगसोबतही काम केले आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे तब्बल ६.७ दशलक्ष फॉलोअर्स असूनही, त्याच्या एकाही फोटोमध्ये त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही.

दरम्यान, दिशा पाटनीच्या लव्ह लाईफची चर्चा यापूर्वीही अनेकदा झाली आहे. तिचं नाव सर्वाधिक अभिनेता टायगर श्रॉफसोबत जोडलं गेलं होतं. काही वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, तिचं नाव टीव्ही अभिनेता पार्थ समथान, तसेच अलेक्झांडर अलेक्स इलिच यांच्यासोबतही जोडलं गेलं. काही काळ ती त्यांच्यासोबत सार्वजनिक ठिकाणी दिसली होती. विशेष म्हणजे, काही काळासाठी तिचं नाव आदित्य ठाकरे यांच्याशीही जोडलं गेलं होतं.

मात्र, तलविंदरसोबतच्या नात्याबाबत दिशा किंवा तलविंदर यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.

 
Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’