एडिट केलेलं फुटेज जाहीर करा’; ‘बिग बॉस मराठी’च्या निर्मात्यांना दिव्या शिंदेचा कायदेशीर इशारा

मुंबई : बिग बॉस मराठी’मधून बाहेर पडल्यानंतर स्पर्धक दिव्या शिंदेने निर्मात्यांवर गंभीर आरोप करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. शोदरम्यान घडलेल्या वादानंतर तिला बाहेरचा मार्ग दाखवण्यात आला होता. मात्र, घराबाहेर आल्यानंतर तिने पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडत बिग बॉस च्या प्रसारित करण्यात आलेल्या काही भागांविषयी प्रश्न उपस्थित केले.


दिव्या शिंदेचा आरोप आहे की, प्रेक्षकांसमोर तिची केवळ आक्रमक बाजू दाखवण्यात आली, तर त्या प्रसंगांआधी काय घडले होते हे प्रसारित करण्यात आले नाही. “पूर्ण फुटेज जाहीर करण्यात यावे,” अशी तिची मागणी असून, अन्यथा पुढील पावले उचलण्याचा इशारा तिने दिला आहे.



नेमकं काय घडलं?


एका टास्कदरम्यान झालेल्या वादानंतर दिव्याने सहस्पर्धकांना उद्देशून केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेतला गेला. तिच्या बोलण्यातून धमकीचा अर्थ निघाल्याचा आरोप इतर स्पर्धकांनी आणि बिग बॉस या शोद्वारे करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रम व्यवस्थापनाने कारवाई करत तिला शोमधून तात्काळ बाहेर काढले.



दिव्याची भूमिका


आपल्या वक्तव्याचा गैरसमज झाल्याचे दिव्याने स्पष्ट केले आहे. तिच्या मते, तिच्या विधानाचा अर्थ प्रत्यक्ष हिंसेशी जोडणे चुकीचे आहे. तसेच तिने स्वतः कार्यक्रम सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा दावा देखील तिने केला आहे.


दरम्यान, या आरोपांवर शोच्या निर्मात्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. संपूर्ण प्रकरणामुळे रिअ‍ॅलिटी शोमधील संपादन प्रक्रियेवर आणि पडद्यामागील घडामोडींवर चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’