Bigg Boss Marathi : राकेश बापटने तन्वीला केलं किस; राखी सावंत भडकली आणि ....

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये राखी सावंत आल्यापासून रोज नवनवीन ड्रामा पाहायला मिळतो. राखी सावंतची एन्ट्री झाल्यानंतर अनेकांची हा शो पाहण्याची उत्सुकता वाढली होती पण आता घरात असं काही घडलं आहे की प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. बिग बॉसचा नवीन प्रोमो पाहून. नेटकऱ्यांनी संमिक्ष प्रतिक्रिया दिल्या आहेत.



नेमकं काय झालं ?


कलर्स मराठीने बिग बॉसचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये राकेश बापट आणि तन्वी कोलते डान्स करताना दिसत आहेत. या रोमॅंटिक डान्स दरम्यान राकेश तन्वीला गालावर किस करतो. त्यानंतर राखी तन्वीला विचारते हा कोणता डान्स आहे? त्यावर तन्वी राकेशला विचार असं सांगते.. तन्वी आणि राकेशचा डान्स सुरू असताना राखी डोळे बंद करते. येवढच नाही तर डान्स संपल्यानंतर राकेश पुन्हा एकदा तन्वीला किस करतो आणि राकेश हसतो, त्यानंतर राखी संतापते आणि तू याचे परिणाम बघ असं म्हणते.


यानंतर राखी हातात कात्री घेऊन रागारागात स्वत:चे केस कापते. राखीच्या अशा वागणुकीमुळे घरातील इतर सदस्य चकित होतात. तिला प्रश्न विचारतात. राकेशही राखी तू हे काय करते आहे, असा प्रश्न विचारतो. त्यावर राखी म्हणते, ” राकेश, मी स्वत: ला शिक्षा देत आहे. मला कोणी हर्ट करू शकत नाही, फक्त मीच स्वत:ला हर्ट करू शकेत. असं म्हणत राखी रडू लागते.





या प्रोमोवर अनेक प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘राखीने टक्कल केलं असतं तर खूप चांगलं झालं असतं..नकली केस कापून काही उपयोग नाही,’ ‘तन्वीच्या घरचे हे सगळं बघून जीव देतील,’ ‘फक्त मनोरंजनासाठी राखी असं करू शकत नाही,’ ‘आता वाटतंय बिग बॉस बंद व्हावं,’ ‘राखी आता अती करतेय,’ ‘तन्वी राकेशची बहीण आहे हे लक्षात ठेवा सर्वांनी,’ ‘बहीण भाऊ म्हणत म्हणत असे वागतात.. बिग बॉससाठी काय काय करतील अशा अनेक समिश्र प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.


त्यामुळे आता यापुढे बिग बॉसच्या घरात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’